रिक्षा, टॅक्सीचालक आणि वाहतूकदारांचे प्रश्न सोडवा अन्यथा ११ फेब्रुवारीला मशाल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:07 AM2021-02-07T04:07:10+5:302021-02-07T04:07:10+5:30
लोकमत न्युज नेटवर्क मुंबई :रिक्षा-टॅक्सीचालक आणि वाहतूकदारांचे प्रश्न सोडवा अन्यथा ११ फेब्रुवारीला कुर्ला ते आझाद मैदान मशाल मोर्चा काढू, ...
लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई :रिक्षा-टॅक्सीचालक आणि वाहतूकदारांचे प्रश्न सोडवा अन्यथा ११ फेब्रुवारीला कुर्ला ते आझाद मैदान मशाल मोर्चा काढू, असा इशारा नवभारतीय शिव वाहतूक संघटनेने दिला आहे.
नवभारतीय शिववातुक संघाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी सांगितले की, कोरोनामुळे वाहनचालकांना वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. कमी उत्पन्न मिळत आहे आणि अनेकांना कर्ज फेडण्यासाठी ईएमआय भरण्यास अडचणी येत आहेत. वाहतूक दारांच्या प्रश्नांबाबत परिवहन आयुक्त, वाहतूक पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला आहे, पण अद्याप निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन दिले आहे.
रिक्षासाठी तीन रुपये आणि टॅक्सीसाठी पाच रुपये भाडेवाढ करावी. कोरोनामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे कर्जमाफी दिली जात नाही, तर त्यांचे हप्त्यावरील व्याज माफ करावे. भाडे नाकारण्यावरून अनेकवेळा वाद होतो. टोलजवळ असलेल्या ठिकाणी त्यांना परवडत नाही.
त्यामुळे टोल माफ करण्यात यावा. इतर राज्यातील बसना राष्ट्रीय परवाना आहे तरी त्यांची अडवणूक केली जात आहे. त्यांची काही चुकी असेल तर दंड आकाराला जावा, पण त्यांना राज्यात येऊ दिले जात हे चुकीचे आहे. तसेच विमानतळ परिसरात टॅक्सीचालकांना अनावश्यक ७० रुपये आकारले जात आहे. मुंबईकरांची ही लूट असून, ते बंद केले जावे असेही ते म्हणाले.
शहरभर अवैधरीत्या पार्क केलेल्या वाहनांचे फोटो काढताना वाहतूक पोलिसांकडून दंड ठोठावणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षाचालकांसाठी पार्किंग हा ही मोठा मुद्दा बनला आहे. पार्किंगसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यासाठी आणि विमानतळावर टॅक्सींसाठी पार्किंगची जागा खुली करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही संघटना नियोजन करणार आहे,'' असे शेख म्हणाले. काही दिवसांपूर्वी विमानतळ प्राधिकरण आणि पोलिसांनी शेख आणि युनियनच्या इतर नेत्यांची भेट घेऊन काही मागण्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.