मुंबई- गेल्या काही दिवसापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आता एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन राज्य सरकारला इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे होते, त्या पद्धतीने सरकार याकडे पाहत नाही. महिन्याच्या महिन्याला कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करुन बैठक घ्यायला हवी. अन्यथा आम्हाला लढा दिल्या शिवाय पर्याय नाही, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.
बॅनरच्या चर्चेनंतर थेट निमंत्रण, तेजस ठाकरे राजकारणात या अन् महाराष्ट्राला समृद्ध बनवा
महाविकास आघाडी सरकार काळात एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी मोठा संप केला होता. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या संपात सहभाग घेत मागण्यांसाठी महाविकास आघाडीला धारेवर धरले होते, आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आहे. या सरकारलाही माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी इशारा दिला आहे. सवलतधारकांचीही एसटीकडे पाठ
एसटी महामंडळांकडून ३० विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येतात. एसटी बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजनेत ४५ ते १०० टक्के भाडे सवलत दिली जाते. मात्र सवलतधारकांमध्ये यंदा घट झाली आहे. लाभार्थी संख्या ७. ७३ कोटी झाली, तर उत्पन्न ३८९ कोटी झाले आहे. वाढलेल्या भाडेदरानुसार हे उत्पन्न १७०० कोटी असायला हवे होते, मात्र १३११ कोटींचा फटका बसला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या एसटीची प्रवासी सेवा पूर्णक्षमतेने सुरू असूनही प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याने दिसून येत आहे. कोरोनामुळे कंबरडे मोडलेला एसटी महामंडळाचा गाडा त्यामध्ये साडेपाच महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एसटीचा प्रवासीवर्ग दुरावला गेला. इतकेच नव्हे, तर भाडे सवलत असणाऱ्या प्रवाशांनीहीदेखील पाठ फिरवल्याचे चित्र आहे.