किरीट सोमय्या पिता-पुत्रांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 06:25 AM2022-04-11T06:25:21+5:302022-04-11T06:25:49+5:30

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Somaiya father son investigation to Financial Crime Branch | किरीट सोमय्या पिता-पुत्रांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

किरीट सोमय्या पिता-पुत्रांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

Next

मुंबई :

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. 

आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी किरीट व निल सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली होती. ट्रॉम्बे पोलिसांनी बजावलेल्या समन्सला ते शनिवारी गैरहजर राहिले होते. दाखल गुन्ह्यातील रक्कम जास्त असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.  ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेहाना शेख यांनी तपास वर्ग केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सर्व कागदपत्रे, पुरावे आर्थिक गुन्हे शाखेकडे दिले आहेत.

Web Title: Somaiya father son investigation to Financial Crime Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.