साठे घोटाळ्यांत आणखी काही नेते

By Admin | Published: July 25, 2015 01:18 AM2015-07-25T01:18:59+5:302015-07-25T01:18:59+5:30

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या घोटाळ्यांचे मुख्य आरोपी

Some of the leaders in the Satya scam | साठे घोटाळ्यांत आणखी काही नेते

साठे घोटाळ्यांत आणखी काही नेते

googlenewsNext

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. या घोटाळ्यांचे मुख्य आरोपी आ. रमेश कदम यांना अटक केली जाईल.
या घोटाळ्यात काही राजकीय व्यक्ती सामील असून, त्यांचीही चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणलेल्या या घोटाळ्याबद्दल सत्तारूढ आणि विरोधी पक्ष सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. ३८५ कोटी रुपयांचे घोटाळे रमेश कदम यांनी केले तेव्हा असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ते माहिती असलेच पाहिजेत तेव्हा त्यांचीही चौकशी करणार का, असा सवाल भाजपाचे अतुल भातखळकर यांनी केला. तेव्हा या भ्रष्टाचाराच्या मागे असलेल्या सगळ्यांचीच चौकशी केली जाईल. गोरगरीब मातंग समाजाचा हक्काचा पैसा खाणाऱ्यांना शासन सोडणार नाही. रमेश कदम यांनी महामंडळाचे कोट्यवधी रुपये आपल्या स्वत:च्या कंपनीच्या खात्यांमध्ये टाकले आहेत. अनेक लोकांना पैशांची खिरापत वाटली. महामंडळातील भ्रष्टाचाराच्या मुळाशी जाऊन सरकार कारवाई करेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Web Title: Some of the leaders in the Satya scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.