मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही सेना नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि राज्यातील उर्वरित भागात राजकीयदृष्ट्या कार्यरत असलेल्या पण विविध व्यवसायांत शेकडो कोटींची उलाढाल असलेल्या या नेत्यांच्या व्यवहारांची छाननी करण्यात येत आहे. त्यातील संशयास्पद आर्थिक व्यवहार असलेल्यांची चौकशी केली जाणार आहे, असे ईडीतील वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.
विहंग सरनाईकांवर प्रश्नांची सरबत्तीप्रताप सरनाईक यांचे पुत्र व टॉप ग्रुपचे संचालक असलेल्या विहंग सरनाईक यांना ईडीच्या एका पथकाने ताब्यात घेऊन मुंबईतील कार्यालयात नेले. त्यांच्याकडे व्यवसाय आणि विविध उद्योगांमध्ये गुंतवणुकीबद्दल विचारणा करण्यात आली. बँक खाती आणि त्यावरील व्यवहारांबद्दल त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत आहे.