ईडीच्या रडारवर आणखी काही सेना नेते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:18 AM2020-11-26T04:18:14+5:302020-11-26T04:18:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून येत्या ...
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही सेना नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि राज्यातील उर्वरित भागात राजकीयदृष्ट्या कार्यरत असलेल्या पण विविध व्यवसायांत शेकडो कोटींची उलाढाल असलेल्या या नेत्यांच्या व्यवहारांची छाननी करण्यात येत आहे. त्यातील संशयास्पद आर्थिक व्यवहार असलेल्यांची चौकशी केली जाणार आहे, असे ईडीतील वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.