आणखी काही अभियंते रडारवर; पाच जणांच्या बडतर्फीची शक्यता, महिनाअखेरीस सादर होईल अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 04:24 AM2018-01-14T04:24:34+5:302018-01-14T04:24:41+5:30

मुंबईतील २३४ रस्त्यांच्या कामात घोटाळा केल्याप्रकरणी १९१ अभियंत्यांवर कारवाई होणार आहे. यापैकी ३४ रस्त्यांच्या चौकशीच्या पहिल्या टप्प्यात ९६ अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, यापैकी ८२ अभियंत्यांचा सहभाग दोन्ही टप्प्यात असल्याने त्यांच्या शिक्षेत बदल होऊ शकतो.

Some other engineers on the radar; Probability of five people will be presented at the end of the month | आणखी काही अभियंते रडारवर; पाच जणांच्या बडतर्फीची शक्यता, महिनाअखेरीस सादर होईल अहवाल

आणखी काही अभियंते रडारवर; पाच जणांच्या बडतर्फीची शक्यता, महिनाअखेरीस सादर होईल अहवाल

Next

मुंबई : मुंबईतील २३४ रस्त्यांच्या कामात घोटाळा केल्याप्रकरणी १९१ अभियंत्यांवर कारवाई होणार आहे. यापैकी ३४ रस्त्यांच्या चौकशीच्या पहिल्या टप्प्यात ९६ अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, यापैकी ८२ अभियंत्यांचा सहभाग दोन्ही टप्प्यात असल्याने त्यांच्या शिक्षेत बदल होऊ शकतो. हा अहवाल जानेवारी महिन्याच्या अखेरीस सादर होणार असून यात आणखी पाच अभियंते सेवेतून बडतर्फ होण्याची शक्यता आहे.
उपायुक्त रमेश बांबळे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने पहिल्या टप्प्यातला अहवाल नुकताच आयुक्तांना सादर केला. या अहवालातील शिफारशींनुसार ९६ अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये चार अभियंत्यांना थेट सेवेतून काढून टाकण्यात आले आहे, तर उर्वरित अभियंत्यांना पदावनती, निवृत्तिवेतनात कपात, तीन ते एक वर्षासाठी वेतनवाढ बंद अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. दुसºया टप्प्यात दोनशे रस्त्यांची चौकशी करून अहवाल तयार करण्यात येत आहे. यामध्ये ८०हून अधिक अभियंते दोषी ठरण्याची शक्यता आहे. तसेच पाच अभियंत्यांना थेट बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, यामध्ये ८२ अभियंत्यांचा
दोन्ही टप्प्यांतील घोटाळ्यांमध्ये सहभाग असल्याने याआधी सुनावलेल्या शिक्षेत बदल होण्याची शक्यता याआधीच आयुक्तांनी वर्तविली होती.

मागील कारवाईचा आढावा
रस्त्यांच्या कामामध्ये अनियमितता असल्याची तक्रार तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केल्यानंतर २०१५मध्ये आयुक्त अजय मेहता यांनी चौकशी आदेश दिले होते. त्यानुसार २०१६मध्ये अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या
चौकशी समितीने पहिल्या टप्प्यात
३४ रस्त्यांची
पाहणी करून अहवाल
सादर
केला.

- रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांचे निलंबन व अटक, दोन कार्यकारी अभियंत्यांना अटक, थर्डपार्टी आॅडिट कंपनीच्या २२ अभियंत्यांना अटक करण्यात आली. एकूण ३० जण अटकेत. पालिकेकडून २७ एप्रिल २०१६मध्ये रोजी एफआयआर दाखल. शंभर अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

- चौकशीच्या दुसºया फेरीत दोनशे रस्त्यांचा पाया कमकुवत असल्याचे समोर आले. या रस्त्यांच्या कामामध्ये हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. १९१ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून याबाबतचा चौकशी अहवाल लवकरच सादर होणार आहे.

- रस्त्यांच्या कामात निकृष्ट दर्जाचा माल वापरल्याचे या चौकशीतून उजेडात आले आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या पृष्ठभागाच्या जाडीमध्ये फरक, काही ठिकाणी नवीन रस्ते तयार करताना ठेकेदारांनी खड्डा खणला नाही, तर काही ठिकाणी डेब्रिज उचलण्यात आलेले नाही, तरीही डेब्रिज नेण्यासाठी वाहतुकीचा खर्च आल्याची बिले ठेकेदारांनी पालिकेकडून उकळली आहेत. अशा बनावट बिलांमुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असा निष्कर्ष या चौकशीतून काढण्यात आला आहे.

- पहिल्या टप्प्याटप्प्यातील चौकशीत पाच उप मुख्य अभियंते, दहा कार्यकारी अभियंते, २१ सहायक अभियंते आणि ६४ दुय्यम अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Some other engineers on the radar; Probability of five people will be presented at the end of the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.