Join us

कोस्टल रोडच्या खोदकामांमुळे तुंबू शकते काही भागांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 2:46 AM

महापालिकेला भीती : खबरदारीसाठी तीन नियंत्रण कक्ष

मुंबई : मच्छीमार व स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे वादात सापडलेला महापालिकेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या खोदकामामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहर भागात काही ठिकाणी पाणी तुंबू शकते. याची जाणीव झाल्यामुळे पालिका प्रशासनाने तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारले आहेत. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचल्यास स्थानिक रहिवाशांना तत्काळ तक्रार करून मदत घेता येणार आहे.

शहरातून पश्चिम उपनगरापर्यंत मुंबईकरांचा प्रवास जलद करणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम डिसेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आले. मात्र या प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकण्यात येत असल्याने मच्छीमारांकडून तीव्र विरोध होत आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली. त्यानुसार काही काळ प्रकल्पाच्या नवीन खोदकामांवर स्थगिती आणण्यात आली होती. जुन्या खोदकामांवर तूर्तास काम सुरू आहे, परंतु यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मेट्रो रेल्वेच्या खोदकामांमुळे काही ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबले होते. म्हणून खबरदारी म्हणून कोस्टल रोडसाठी केलेल्या खोदकामांच्या ठिकाणीही पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्यात येत असल्याचे पालिकेच्या एका अधिकाºयाने सांगितले. पालिकेने या प्रकल्पाचे काम करणाºया ठेकेदारामार्फत तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारले आहेत. प्रियदर्शिनी उद्यान, अमरसन्स उद्यान व वरळी डेअरी या तीन ठिकाणांच्या जवळ हे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.पाणी तुंबल्यास येथे करा तक्रार...च्ठेकेदाराने उभारलेले तीन नियंत्रण कक्ष महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहेत. ‘कोस्टल रोड’चे बांधकाम सुरू असलेल्या भागात पाणी साचल्यास नागरिकांनी संबंधित नियंत्रण कक्षाकडे किंवा पालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी किंवा त्याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन सागरी किनारा रस्त्याचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांनी केले आहेदक्षिण मुंबईतील श्यामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) ते राजीव गांधी सागरी सेतू (वरळी सी लिंक) यांना जोडणारा ९.९८ कि.मी. लांबीचा सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) देशातील या प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे.

टॅग्स :मुंबई