Join us

शिवडी-न्हावाशेवा सीलिंकच्या उड्डाणपुलांची काही कामे अपूर्ण; मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 10:07 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवडी-न्हावाशेवा सी लिंकला जोडणाऱ्या उड्डाण पुलांचीही पाहणी केली.

देशातील सर्वात मोठा लांबीचा सागरी सेतू, टोल नाक्याशिवाय टोल कापला जाणारी यंत्रणा आणि अनेक वैशिष्ट्यांमध्ये ख्याती असलेल्या शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकचे येत्या १२ जानेवारीला लोकार्पण होणार आहे. याच्या तयारीची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी शिंदे यांनी काही अपूर्ण असलेली कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 

१२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सागरी सेतूचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या सागरी सेतूवरुन प्रवास करण्यासाठी टोलचा दर किती असणार हेही निश्चित करण्यात आले आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर टोलचा दर २५० रुपये इतका असणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या सागरी सेतूवरुन प्रवास करण्यासाठी ५०० रुपये टोल आकारण्यात येणार असल्याची चर्चा होती. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवडी-न्हावाशेवा सी लिंकला जोडणाऱ्या उड्डाण पुलांचीही पाहणी केली. काही कामे अपूर्ण असल्याने संबधित विभागाला काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे.

ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे. हा मार्ग २२ किमी लांबीचा असून जवळपास १८ किमी समुद्रातून आहे. तर पावणे चार किमीचा मार्ग हा जमिनीवरील आहे. मुंबईतल्या शिवडीतून नवी मुंबईचे अंतर आता अवघ्या २० मिनिटांत कापता येईल. दुसरीकडे हा मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला देखील जोडला जातोय. त्यामुळे मुंबई-पुणे अंतर देखील या मार्गामुळे कमी होण्यास मदत होईल. 

टॅग्स :एकनाथ शिंदे