"कुणीतरी माझा पाठलाग करतंय", शीतल म्हात्रेंची पोलिसात धाव; दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

By मनीषा म्हात्रे | Published: March 14, 2023 07:34 PM2023-03-14T19:34:46+5:302023-03-14T19:36:03+5:30

शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी राज्यात वादंग निर्माण झाले असताना आता मुंबईत दादर येथे म्हात्रे यांच्यासोबत आणखी एक धक्कादायक प्रसंग घडला आहे.

Someone is following me Sheetal Mhatre run to the police A case has been registered against two unknown persons | "कुणीतरी माझा पाठलाग करतंय", शीतल म्हात्रेंची पोलिसात धाव; दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

"कुणीतरी माझा पाठलाग करतंय", शीतल म्हात्रेंची पोलिसात धाव; दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

मुंबई-

शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी राज्यात वादंग निर्माण झाले असताना आता मुंबईत दादर येथे म्हात्रे यांच्यासोबत आणखी एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. दोन अनोळखी व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याची तक्रार शीतल म्हात्रे यांनी दादर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. पोलिसांनी याची तातडीनं दखल घेत दोन अनोळखी व्यक्तींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली आहे. 

शीतल म्हात्रे सोमवारी त्यांच्या मातोश्रींची भेट घेण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आल्या होत्या. आईला भेटून दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान बाळासाहेब भवन, चर्चगेट मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी निघाल्या. यावेळी बाईकवरुन दोन जण आपला पाठलाग करत असल्याचं म्हात्रे यांना निदर्शनास आलं. "माझ्या सोबत चालक विशाल जाधव तसेच सुरक्षेसाठी नेमणूकीस असलेले पोलीस महाले हे देखील वाहनात होते. मी वाहनाच्या मधील सिटवर डाव्या बाजूला बसले होते. आमची कार शिवाजी पार्क येथून वीर सावरकर मार्गाने मुंबईच्या दिशेने पुढे जात होती. पुढे  इंदुमील जंक्शन येथून किर्ती कॉलेज जंक्शन या ठिकाणी येत असतांना आमच्या वाहनांचा दुचाकीवरून दोन जण पाठलाग करत असल्याचे निदर्शनास आले", असं शीतल म्हात्रे यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.  

"दुचाकीवरील व्यक्ती, माझ्या कारजवळ येऊन माझ्याकडे वारंवार टक लावून पाहत असल्याचं मी पाहिलं. तसंच सदर स्कुटरवरील दोन इसमांपैकी मागे बसलेला इसम हा माझ्या दिशेनं हातवारे करत असताना मला दिसलं. मला ते दोन्ही इसम माझ्यावर हल्ला करण्याची भिती वाटल्याने वाहन चालकास गाडीचा वेग वाढविण्यास सांगितला. त्याप्रमाणे आमचे वाहन वेगाने पुढे निघून गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे", असंही शीतल म्हात्रे यांनी सांगितलं. 

दादर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (डी), ३५२ आणि ३४ अन्वये दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दादर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Someone is following me Sheetal Mhatre run to the police A case has been registered against two unknown persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई