कुणाचे नशीब फळणार; म्हाडाचे घर कुणाला लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:45 PM2023-06-07T12:45:35+5:302023-06-07T12:46:43+5:30
प्रत्येकाला घर मिळावे यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रत्येकाला घर मिळावे यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत. मुंबईत म्हाडाच्या घराची योजना आता टॉपवर असून, सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा प्रारंभ ‘गो - लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत झाला आहे. विशेष म्हणजे नवीन सोडत प्रक्रिया सुलभ आणि सोपी असून, सोडतीत सहभाग घेण्याकरिता अर्जदारांना सात कागदपत्रे सादर करायची आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची किंमत ही केंद्र व राज्य सरकारचे प्रती सदनिका एकूण अनुदान अडीच लाख रुपये वजा करून निश्चित करण्यात आली आहे.
पुस्तिका https:// housing.mhada. gov.in या म्हाडाच्या संकेतस्थळावर क्लिक लिंक या विंडोमध्ये इच्छुक अर्जदारांकरिता उपलब्ध आहे.
येथे घरे
अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन.
सोडत
१८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात होणार आहे.
२६ जून - सायंकाळी ६ पर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय खुला.
२६ जून - रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार.
२८ जून - संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करता येणार.
४ जुलै - सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी दुपारी ३ पर्यंत प्रसिद्ध होईल.
७ जुलै - प्रारूप यादीवर अर्जदारांना हरकती दाखल करता येतील.
१२ जुलै - दुपारी ३ वाजता https:// housing.mhada.gov.in संकेतस्थळावर सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
किमान मर्यादा निश्चित केली नसली तरी काय?
- अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतील. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी तर मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.