Join us

सूनबाई म्हणते, मिळतेय ते खा नाही तर चालते व्हा! औषधांसह घरगुती सामानासाठीही ज्येष्ठांचा येतो फोन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 11:09 AM

घरात एकट्या असलेल्या वृद्धांना घरातील रेशनिंगपासून गॅस, लाइटबिल, औषध आणण्यासाठी पोलिस त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतात. अशात, त्यांच्यातील नाळ अधिक घट्ट होताना दिसते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षासह एल्डर हेल्पलाइनवर ज्येष्ठ नागरिकांकडून औषधांसह घरगुती सामानासाठी कॉलची खणखण सुरू असते. तसेच काहीवेळा सून छळ करतेय, अशाही कॉलची भर पडते. त्यांनाही तत्काळ मदत मिळताना दिसत आहे. कोरोनाच्या काळातही हेल्पलाइन अनेकांना आधार ठरली.

एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून त्यात राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा समावेश आहे. यामध्ये ज्येष्ठ संबंधित दाखल गुन्ह्यात दिल्ली (१,१६६) पाठोपाठ मुंबई (९८७) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई (४२३) तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोषारोपपत्र दर ५२ टक्के आहे. त्यामुळे एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून गस्त, भेटीगाठींवर अधिक भर देताना दिसतो. 

घरात एकट्या असलेल्या वृद्धांना घरातील रेशनिंगपासून गॅस, लाइटबिल, औषध आणण्यासाठी पोलिस त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतात. अशात, त्यांच्यातील नाळ अधिक घट्ट होताना दिसते.

पोलिसांचा आधार...मुंबईत एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक तसेच वृद्ध आजी-आजोबांची माहिती पोलिस दफ्तरी नोंद आहे. अशात प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत त्यांच्या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी तसेच त्यांच्या नियंत्रण कक्षात येणाऱ्या  कॉलला मुंबई पोलिस धावून जात आहेत. 

ही आहे एल्डर हेल्पलाइन एल्डर हेल्पलाइन ही प्रगत जीपीएस-आधारित ट्रॅकिंग प्रणालीने अद्ययावत आहे. एखाद्या व्यक्तीने १०९० या क्रमांकावर संपर्क साधताच त्याचे अचूक स्थान स्क्रीनवर अचूकपणे दर्शविले जाते. योग्य स्वयंसेवकांचा मागोवा घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे आणि स्वयंसेवकांना किंवा जर गरज असेल तर पोलिस मोबाइल लगेच पाठविणे याकरिता मदत करते. एल्डर हेल्पलाइन मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांची माहिती संकलित करते, जेणेकरून नेहमी मदतीसाठी असते. जर स्वयंसेवक उपलब्ध नसतील, तर पोलिस अधिकारी पाठविले जातात. हे सर्व त्यांना उत्तमप्रकारे मदत करण्यासाठी आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी मदतीसाठी या हेल्पलाइनवर कॉल करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अशावेळी करा कॉल...n तातडीने वैद्यकीय व्यावसायिकांच्या, डॉक्टरांच्या मदतीची आवश्यकता आहे.   n शारीरिक हिंसा असते किंवा त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो तेव्हा.n ज्येष्ठ नागरिक स्वत:च नोंदणीसाठी १०९० ला फोन करू शकतात.

टॅग्स :ज्येष्ठ नागरिक