Join us  

पुत्र 'सुजात'चा राजकीय उदय झाला का? पिता प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 3:21 PM

सुजातने आत्ताच एमएससी केलंय, त्याला आणखी शिकायचं आहे

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भाषणानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी केलेल्या विधानामुळे ते चांगलेच चर्तेत आले होते. राज ठाकरेंना थेट तुमच्या मुलाला म्हणजे अगोदर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा म्हणालया पाठवा लावा, असे सुजात यांनी म्हटले होते. त्यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली. तसेच, वंचित बहुजन आघाडीचे युवक नेते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. मात्र, याबाबत त्यांचे वडिल प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं आहे. 

सुजातने आत्ताच एमएससी केलंय, त्याला आणखी शिकायचं आहे. शिक्षणासाठी तो बाहेर जातोय. तो आता पूर्णवेळ शिकायला जाणार आहे. गेल्या 2-3 दिवसांत त्याने मांडलेल्या भूमिकेबद्दल मी एवढचं म्हणेन. पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारले आणि त्याने उत्तर दिलं. त्याचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्याने राजकारण यायचं नाही, हे मी त्याला सांगितलं आहे, असे स्पष्ट शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय. अकोल्यात प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामध्ये, प्रकाश आंबेडकरांनी एसटी महामंडळ, सिल्व्हर ओक हल्लाप्रकरण, राज ठाकरे, सुजातचं राजकारण यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. 

दरम्यान, सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंच्या भाषणानंतर थेट ब्राह्मण समाजाल लक्ष्य केलं होतं. उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण दंगली घडविण्याचं काम करतात आणि त्यात बहुजन समाजातील पोरं उतरतात, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर टिका केली होती.

विश्वास नांगरे पाटलांना निलंबित करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानासमोर अनुचित प्रकार घडू शकतो, असे पत्र गुप्तचर यंत्रणांनी सह पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) यांना घटनेच्या चार दिवस आधी म्हणजेच ४ एप्रिल रोजी दिले होते. यासंदर्भात योग्य कार्यवाही करणे गरजेचे असतानाही विश्वास नांगरे पाटील यांनी तसे केली नाही. ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांनाच या घटनेच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीचे प्रमुख करणे आक्षेपार्ह असून, त्यांना तातडीने या पदावरून हटवून त्यांचीच चौकशी करावी व माहिती दडवून ठेवली म्हणून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (१३ एप्रिल)येथे केली.

उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी बोलावलं होतं

पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी युती संदर्भात एक मोठं वक्त्यव्य केले. ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेची(Shivsena) युती करण्यात तयार आहोत. त्यासंदर्भात मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी एकदा भेटीसाठी  बोलवलंही होतं. शिवसेनेने भाजपाशी नातं तोडलं आहे तर आम्हाला सोबत घ्यावं. मात्र त्यांची काही हिंमत झाली नाही मला काही बोलायची. त्याच बरोबर आम्ही काँग्रेस(Congress) समोरही युतीचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र त्यांनी ठरवावं युती करायची किंवा नाही. आम्ही लग्नाला तयार आहोत मात्र शिवसेना आणि काँग्रेस आमच्या सोबत फिरायला तयार आहेत मात्र लग्नाला कोणीही तयार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरमनसेराज ठाकरेवंचित बहुजन आघाडी