सोनिया सेठी यांच्याकडे एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:08+5:302021-06-02T04:06:08+5:30

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी कार्यरत असलेल्या डॉ. सोनिया सेठी यांच्याकडे प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदाचा ...

Sonia Sethi has the additional charge of MMRDA's Metropolitan Commissioner | सोनिया सेठी यांच्याकडे एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार

सोनिया सेठी यांच्याकडे एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार

Next

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी कार्यरत असलेल्या डॉ. सोनिया सेठी यांच्याकडे प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. मिलिंद म्हैसकर, महेश पाठक आणि संजय सेठी हे वरिष्ठ अधिकारी एमएमआरडीएच्या आयुक्त पदाच्या शर्यतीत आहेत. त्यापैकी डार्क हॉर्स कोण ठरतो, हे आता राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे.

डॉ. सोनिया सेठी या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेचे नेतृत्व फेब्रुवारी २०१९ पासून करीत आहेत. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेड बिझनेस स्कूल येथून मेजर प्रोग्राम मॅनेजमेंट या विषयात पदव्युत्तर पदवी, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग या विषयांत डॉक्टरेट मिळविली आहे. त्या १९९४ च्या बॅचच्या, भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकारी आहेत. महाराष्ट्र केडरमधील त्या प्रथम महिला अधिकारी आहेत. त्यांनी सिडकोच्या सहसंचालक, एमएसआरडीसीच्या सहव्यवस्थापकीय संचालक व व्यवस्थापकीय संचालक, परिवहन आयुक्त अशी विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत.

एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना वांद्रे-वरळी सागरी महामार्ग कार्यान्वित करण्यात आला. सागरी महामार्ग विस्तार, जलवाहतूक, फ्लायओव्हर, रस्त्यांचे जाळे अशा प्रकल्पांची संरचना त्यांनी प्रभावीपणे केली.

..............................................

Web Title: Sonia Sethi has the additional charge of MMRDA's Metropolitan Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.