वाढदिवसानिमित्त सोनू सूदची मोठी घोषणा; 3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 07:56 PM2020-07-30T19:56:41+5:302020-07-30T20:05:01+5:30

आज सोनू सूदचा 47 वा वाढदिवस आहे.

Sonu Sood Announces 3 Lakh Jobs For Migrants On His Portal Pravasi Rojgar On His Birthday | वाढदिवसानिमित्त सोनू सूदची मोठी घोषणा; 3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी

वाढदिवसानिमित्त सोनू सूदची मोठी घोषणा; 3 लाख स्थलांतरित मजुरांना देणार नोकरी

Next

कोरोना व्हायरसच्या संकटात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा अनेकांच्या मदतीला धावला आहे. लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या जन्मभूमीत पाठवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करण्यापर्यंत सर्व समाजकार्य सोनू  सूदनं केली आहेत. आज सोनू सूद त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण, वाढदिवसाला सोनू सूदनं स्थलांतरित मजुरांसाठी मोठी भेट दिली आहे.

हार्दिक पांड्याला पुत्ररत्न; भारतीय क्रिकेटपटूनं शेअर केला फोटो 

रिअल लाईफमधील नायकाला लोकं सुपरहिरो म्हणू लागली आहेत. त्यानं स्थलांतरित मजुरांसाठी 'प्रवासी रोजगार.कॉम' ही वेबसाईट सुरू केली आहे आणि त्यातून तो 3 लाख मजुरांना नोकरी देणार आहे. ''माझ्या वाढदिवसाला स्थलांतरित बांधवांसाठी 3 लाख नोकरी देण्यासाठी PravasiRojgar.comचा माझा संकल्प... या नोकरींत तुम्हाला PF, ESI आणि अन्य सुविधाही मिळणार आहेत,''असे त्याने ट्विट केले आहे.


लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. सोनू सूद बेरोजगार तरुणांना नोकरी देणार आहे. त्याची ही वेबसाईट कोणतही शुल्क आकारत नाही. या वेबसाईटवर 450 कंपन्या नोकरी देणार आहेत आणि आतापर्यंत 1 लाख लोकांना नोकरी दिली गेली आहे. अधिक माहितीसाठी 1800 121 664422  या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

याला काय अर्थ आहे राव! हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; पण मीम्स बनले विराट-अनुष्कावर 

आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत! 

139 दिवसानंतर आज होणार आंतरराष्ट्रीय वन डे सामना; 29 वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक! 

IPL 2020च्या फायनलची तारीख बदलणार, 8 नोव्हेंबर ऐवजी 'या' तारखेला होणार; पण का?

तेव्हा 'दैव' टीम इंडियाच्या बाजूनं होतं; आफ्रिदीनं अपयशाचं खापर फोडलं नशिबावर

Bold & Beauty! भारताची पहिली महिला सर्फर इशितानं वेधलं क्रीडा विश्वाचं लक्ष

Web Title: Sonu Sood Announces 3 Lakh Jobs For Migrants On His Portal Pravasi Rojgar On His Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.