Join us

सोनू सूदला उच्च न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:07 AM

सोनू सूदला उच्च न्यायालयाचा दणकापालिकेविरोधातील याचिका फेटाळलीसोनू सूदला उच्च न्यायालयाचा दणकाबेकायदेशीर बांधकाम प्रकरण : पालिकेविरोधातील याचिका ...

सोनू सूदला उच्च न्यायालयाचा दणका

पालिकेविरोधातील याचिका फेटाळली

सोनू सूदला उच्च न्यायालयाचा दणका

बेकायदेशीर बांधकाम प्रकरण : पालिकेविरोधातील याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जुहूमधील इमारतीत बेकायदेशीर बांधकामप्रकरणी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. सूदने केलेला अपिल आणि अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला.

मेहनती लोकांनाच कायदा मदत करतो, असे म्हणत न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकदस्यीय खंडपीठाने सोनू सूदचा अपिल फेटाळला. त्यावर सूदच्या वकिलांनी मुंबई पालिकेने बजावलेल्या नोटीसचे पालन करण्यासाठी दहा आठवड्यांची मुदत न्यायालयाकडून मागितली. तसेच तोपर्यंत पालिकेला कारवाई न करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही विनंती न्यायालयाला केली.

न्यायालयाने त्यास नकार दिला. आधीही अनेकवेळा तुम्हाला (सूद) संधी होती. गरज असल्यास पालिकेकडे जा. आता पालिकाच यावर निर्णय घेईल. अनेकवेळ संधी मिळूनही तुम्ही उशीर केलात, असे न्यायालयाने म्हटले.

जुहूच्या इमारतीत बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी व इमारतीतील फ्लॅटचे हॉटेल रुम्समध्ये रूपांतर केल्याने मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिसला सोनू सूदने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.