फ्लॅट विक्री होताच ‘महारेरा’कडे करावी लागणार नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:06 AM2021-04-11T04:06:49+5:302021-04-11T04:06:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : फ्लॅटची विक्री होताच त्याची माहिती आता ‘महारेरा’कडे नोंद करावी लागणार आहे. फ्लॅटची विक्री करताना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फ्लॅटची विक्री होताच त्याची माहिती आता ‘महारेरा’कडे नोंद करावी लागणार आहे. फ्लॅटची विक्री करताना विकासकाकडून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी ‘महरेरा’ने हा निर्णय घेतला आहे. याबाबत नुकतेच ‘महारेरा’ने एक परिपत्रक जारी केले आहे. यासाठी महारेराने एक नमुना अर्ज जारी केला आहे. या अर्जातील तक्त्यानुसार विकासकांना घरांचेे बुकिंग होताच त्या संबंधित घरांची सर्व माहिती महारेराकडे सादर करावी लागणार आहे. यामुळे घर खरेदी करताना खरेदीदारांना संबंधित प्रकल्पातील घरांची स्थिती काय आहे हे समजणार आहे. विकासकांकडून घरविक्री करताना ग्राहकांची होणारी फसवणूक थांबणार आहे.
अनेकदा विकासक आपल्या प्रकल्पातील एकच फ्लॅट अनेक ग्राहकांना विकतात; परंतु आता महारेराने कायद्यात बदल केल्यामुळे घराची बुकिंग होताच त्याची नोंदणी करणे बंधनकारक राहील. फसवणुकीच्या प्रकरणांना आळा बसणार आहे.