Join us

शरद पवारांनी इन्मॅच्युअर म्हणताच भाजपा नेत्यानं केलं कौतुक, 'पार्थ' लंबी रेस का घोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 4:01 PM

शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना, महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही", असे शरद पवार यांनी स्पष्ट केले

ठळक मुद्देपार्थ यांनीच याबाबतची मागणी केल्याचं सांगताच, पार्थच्या मताला किंमत नसल्याचे पवार म्हणाले. तो इन्मॅच्युअर आहे, असेही त्यांनी म्हटले. 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर पार्थ पवार यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहेत, असे म्हणत पवार यांनी पार्थच्या मताला किंमत नसल्याचे म्हटले. त्यानंतर, राणेपुत्र आमदार नितेश राणेंनी पार्थ पवार यांचं कौतुक केलंय.  

शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना, महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही", असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. याचबरोबर, मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसांना 50 वर्षे ओळखतो. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यासोबत, पार्थ यांनीच याबाबतची मागणी केल्याचं सांगताच, पार्थच्या मताला किंमत नसल्याचे पवार म्हणाले. तो इन्मॅच्युअर आहे, असेही त्यांनी म्हटले. 

शरद पवार यांचे हे विधानस मीडियात झळकताच, आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवारचे कौतुक केलंय. 'आज परत सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा है... थांबू नकोस मित्रा!' असे ट्विटर नितेश यांनी केलंय. दरम्यान, पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांत आपली भूमिका महाविकास आघाडी सरकारसोबत नसल्याचे कृतीतून दाखवून दिलंय. पार्थ यांनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तर, जय श्रीराम म्हणत राम मंदिराच्या भूमिपूजनाचे उघडपणे समर्थन केले होते.  

दरम्यान, काही दिवसांपूर्वी  पार्थ पवार यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते.  

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रशरद पवारपार्थ पवारनीतेश राणे