Join us

लवकरच ११० वैमानिक पदाची भरती, ‘अकासा’ वाढवणार फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 6:36 AM

वैमानिकांच्या अभावी कंपनीला काही मार्गांवरील विमानसेवा देखील रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा नव्या जोमाने वैमानिक भरतीचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

मुंबई : गेल्या ऑगस्टमध्ये भारतीय विमान क्षेत्रात आपल्या व्यवसायाची सुरुवात केलेल्या अकासा कंपनीने लवकरच ११० वैमानिकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांत एअर इंडिया, इंडिगो अशा काही मोठ्या कंपन्यांकडून नव्या विमानांची खरेदी करण्यात आली होती. याचा फटका कंपन्या अकासासह अन्य काही कंपन्यांना बसला होता. त्यामुळे त्याचा परिणाम कंपनीच्या कामगिरीवर झाला होता. 

वैमानिकांच्या अभावी कंपनीला काही मार्गांवरील विमानसेवा देखील रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा नव्या जोमाने वैमानिक भरतीचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सध्या कंपनीच्या ताफ्यात २० विमाने असून ४५० वैमानिक कार्यरत आहेत. कंपनीला आणखी किमान ११० नव्या वैमानिकांची गरज आहे.

ही भरती पूर्ण झाल्यावर कंपनीला विविध मार्गांवरील जोडणी वाढवितानाच विद्यमान मार्गांवरील फेऱ्यांमध्ये देखील किमान ३५ टक्क्यांनी वाढ करता येणार आहे. दरम्यान, येत्या डिसेंबरपर्यंत कंपनी सध्याच्या तुलनेत आपल्या फेऱ्यांच्या संख्येत किमान १० टक्क्यांनी वाढ करणार असल्याचे समजते.

टॅग्स :विमानमुंबई