"मुंबईत येताच कंगनाला होम क्वारेंटाईन करणार, विमानतळावरच हातावर शिक्का मारणार" महापौरांचा सक्त इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 09:00 AM2020-09-08T09:00:39+5:302020-09-08T09:02:22+5:30

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला मुंबईत दाखल होताच होम क्वारेंटाईन करण्यात येणार आहे, असा सक्त इशारा दिला आहे.

"As soon as she arrives in Mumbai, Kangana Ranaut will be quarantined at home, stamped on her hand at the airport" | "मुंबईत येताच कंगनाला होम क्वारेंटाईन करणार, विमानतळावरच हातावर शिक्का मारणार" महापौरांचा सक्त इशारा

"मुंबईत येताच कंगनाला होम क्वारेंटाईन करणार, विमानतळावरच हातावर शिक्का मारणार" महापौरांचा सक्त इशारा

Next
ठळक मुद्देशिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका कंगनाविरोधात सक्त कारवाईच्या तयारीतसोमवारी कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला मुंबईत दाखल होताच होम क्वारेंटाईन करण्यात येणार आहे, असा सक्त इशारा दिला

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसागणित अधिकाधिक चिघळत आहे. एकीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत सुरू असलेले वाकयुद्ध शिगेला पोहोचले असताना ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याच्या आपल्या इराद्यावर कंगना ठाम आहे. दरम्यान, आता शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका कंगनाविरोधात सक्त कारवाईच्या तयारीत आहे. सोमवारी कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर आता आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला मुंबईत दाखल होताच होम क्वारेंटाईन करण्यात येणार आहे, असा सक्त इशारा दिला आहे.

कंगना राणौत हिला होम क्वारेंटाइन करण्याबाबत मुंबईच्या महापौरांनी नियमावर बोट ठेवले आहे. कंगना मुंबईत परतल्यावर होम क्वारेंटाइन करण्यात येणार आहे. परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींना १४ दिवस होम क्वारेंटाइन करण्याचा नियम आहे. त्या नियमाप्रमाणे कंगनालाही होम क्वारेंटाइन करण्यात येईल. त्यासाठी ती विमानतळावर दाखल झाल्यानंतर लगेच तिच्या हातावर होम क्वारेंटाइनचा शिक्का मारण्याच येईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

कंगनाच्या पाली हिल कार्यालयावर होणार कारवाई; पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्रे येथील पाली हिल परिसरातील कार्यालयात अवैधरित्या काही बदल झाले आहेत. जानेवारीत कंगनाने या मालमत्तेचे नुतनीकरण करून तिथे कार्यालय स्थापन केले. मात्र, या जागेचा निवासी वापर बदलून व्यावसायिक केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. सोमवारी केलेली पाहणी आणि मंजूर आराखड्याच्या आधारे पालिकेचे पथक दोन दिवसांत अहवाल तयार करणार आहे. त्यानंतर लगेचच पुढील कारवाई निश्चित करण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

कंगना-राऊत दोघांचेही सूर नरमले
शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यातील शब्दिक युद्धाने सोमवारी काहीसा नरमाईचा व खुलासेवजा सूर आळवला. एकीकडे कंगनाने 'मला महाराष्ट्र आवडतो' असे ट्विट करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तर, आम्हाला शिवसेना प्रमुखांनी महिलांच्या सन्मानाची शिकवण दिल्याचे ट्विट राऊत यांनी केले.  
राऊत यांनी कंगनाचा हरामखोर असा केलेला उल्लेख केल्याबद्दल समाज माध्यमातून ठपका ठेवला जात आहे. त्यामुळे राऊत यांनी आपली बाजू स्पष्ट केली. आम्हाला महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. मात्र काहीजण खोडसाळपणे शिवसेनेने महिलांचा अपमान केला अशी चुकीची माहिती पसरवत आहेत. हरामखोर या शब्दाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तर, कंगनाने महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर मला मोठे हिरो असलेले, बिग बॅनर चित्रपट आॅफर करण्यात आले, पण मी सर्वांना नाकारले. प्रचंड विरोध सहन केला, त्यानंतर मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी, कारण मला महाराष्ट्र आवडतो, असे टिष्ट्वट कंगनाने केले.

Web Title: "As soon as she arrives in Mumbai, Kangana Ranaut will be quarantined at home, stamped on her hand at the airport"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.