मुंबई : शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत हजर राहता यावे यासाठी त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भात राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे आता लवकरच त्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता आहे.
शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रवासाची गैरसाय हाेऊ नये म्हणून त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची विनंती केली आहे.