मुंबई : वर्सोव्यातील एका सुशिक्षित तरुणाला एजंटने गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून इंडोनेशियात पाठवून फसवणूक केल्याचे प्रकरण त्यामुळे उघडकीस आले आहे. जाकार्ता येथे अनेक दिवसापासून कामाविना भटकत असलेल्या या तरुणाने मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटरवरून आपल्या व्यथा कळविल्या. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने पावले उचलत त्याच्या मदतीसाठी योग्य पावले उचलली आहेत. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.क्षितिज गानेकर असे या तरुणाचे नाव अडकला आहे. फेसबुकवरून मुंदडा नावाच्या व्यक्तीने इंंडोनेशिया येथे मर्चंट नेव्हीमध्ये चांगल्या पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष त्याने गानेकरला दाखवले. मुंदडावर विश्वास ठेऊन इंडोनेशियातील जाकार्ता गाठले. मात्र, तेथे गेल्यानंतर मुंदडाने त्याच्याशी संवाद तोडला. त्याच्याकडील सगळे पैसेही संपले. त्यामुळे पुन्हा भारतात परतण्याचे मार्ग बंद झाल्याने हा गानेकर खचून गेला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांना टिष्ट्वट करून आपली समस्या मांडली. त्यानुसार, सोमवारपर्यंत त्याच्यापर्यंत मदत पोहोचविली जाईल, असे पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
इंडोनेशियात अडकलेल्या तरुणाने मांडली टिष्ट्वटरद्वारे व्यथा
By admin | Published: January 03, 2016 2:56 AM