सोशल मीडियामुळे घटला हॉर्नचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 02:38 AM2019-06-11T02:38:45+5:302019-06-11T02:39:11+5:30

गेल्या वर्षी आवाज फाउंडेशन, मुंबई पोलीस यांनी पुढाकार घेऊन हॉर्न न वाजविण्याबाबत जनजागृती केली होती.

The sound of the reduced horn due to social media | सोशल मीडियामुळे घटला हॉर्नचा आवाज

सोशल मीडियामुळे घटला हॉर्नचा आवाज

Next

मुंबई : मुंबईतील वाहनांची संख्या वाढली आहे. पूर्वी बेधुंदपणे हॉर्न वाजविले जायचे. परंतु तरुण मुलांना सोशल मीडियातून हॉर्न वाजविल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती मिळते. हेच तरुण सोशल मीडियातून नो हॉर्नबाबत जनजागृती करत आहेत. त्यामुळे आज हॉर्न वाजविण्याच्या प्रमाणात घट झाली आहे, असे चेंबूर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण माने यांनी सांगितले.

गेल्या वर्षी आवाज फाउंडेशन, मुंबई पोलीस यांनी पुढाकार घेऊन हॉर्न न वाजविण्याबाबत जनजागृती केली होती. आवाज फाउंडेशनने गेल्या वर्षी मुंबई पोलीस आणि आॅटो रिक्षा युनियन यांच्या मदतीने नो हॉर्न मोहीम राबविली होती. लोकांना हॉर्न न वाजविण्याचे आवाहन करण्यात आले़ हॉर्न वाजविल्यामुळे होणाºया दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी एका आटो रिक्षाला हजारो हॉर्न बांधून रॅली काढण्यात आली. आवाजामुळे इतर वाहनचालकांवर आणि प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यांचे मानसिक संतुलन बिघडते, त्यांच्या हृदयावर परिणाम होतो. अनेक वेळा चिडचिडेपणा येऊन वाद होतात. ऐकण्यावर परिणाम होतो याची माहिती देण्यात आली़ या जनजागृतीमुळे मुंबईकर सतर्क झाले आहेत, असे आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुलअली यांनी सांगितले. देशातील इतर शहरांचे हॉर्न वाजविण्याचे प्रमाण जास्त आहे. इतर शहरांतील वाहनचालक वाहन सुरू केल्यापासून बंद करेपर्यंत अनेक वेळा हॉर्न वाजवितात. या तुलनेत मुंबईमध्ये हॉर्न वाजविण्याचे प्रमाण कमी आहे. जयपूर, दिल्ली आदी शहरांतून मुंबईत येणाऱ्यांनी हा अनुभव सांगितला आहे.

कर्कश आवाज बंद
सोशल मीडियावरही हॉर्न वाजविणाºयांच्या तक्रारी येतात. विनाकारण हॉर्न वाजवणाºयांना दंड आकारला जातो़ त्याला याबाबत होणाºया परिणामांची समज दिली जाते. यापूर्वी काही वाहनांना कर्कश आवाज देणारे हॉर्न लावले जायचे. पण या वाहनचालकांवर होणारी कारवाई आणि जनजागृतीमुळे आता या प्रकारचे हॉर्न वाहनांना लावले जात नाहीत. त्यामुळे हा कर्कश आवाज मुंबईतून हद्दपार झाला आहे.
- बाळकृष्ण माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चेंबूर वाहतूक पोलीस

Web Title: The sound of the reduced horn due to social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.