वाहनांच्या आवाजाने मुंबईकर हैराण
By admin | Published: July 27, 2015 01:44 AM2015-07-27T01:44:43+5:302015-07-27T01:44:43+5:30
मुंबईकर सध्या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने हैराण झाले आहेत. अशा वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असून
मुंबई : मुंबईकर सध्या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने हैराण झाले आहेत. अशा वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असून, गेली ४ वर्षे ५ महिन्यांत तब्बल ६३ हजार ४0४ वाहनांवर कारवाई केल्याचे वाहतूक पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
मुंबईत सध्या एकूण २५ लाख २७ हजार ८७१ वाहने धावत आहेत. दिवसाला ४00पेक्षा अधिक वाहनांची भर पडत असून, वाढणाऱ्या वाहनांचा प्रश्न गंभीर असल्याचे वाहतूक पोलीस सांगतात. वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येने बेजार झालेल्या मुंबईकरांच्या त्रासात वाहनांच्या कर्णकर्कश आवाजांची भर पडली आहे. मोठ्यामोठ्याने हॉर्न वाजवणे, त्याचबरोबर म्युझिकल, रिव्हर्स हॉर्न वाजवण्याचे प्रकार घडत आहेत.
गेल्या ४ वर्षे ५ महिन्यांत केलेल्या दंडात्मक कारवाईत ५७ लाख ४३ हजार रुपये वसूल केले आहेत. २0१४मध्ये १३ हजार २७६ केसेस दाखल झाल्या असतानाच २0१५च्या मे महिन्यापर्यंत ४ हजार ७0८ केसेस दाखल झाल्याचेही सांगण्यात आले.