भारतीय नौदलाचा दणदणीत विजय

By admin | Published: September 26, 2015 02:47 AM2015-09-26T02:47:59+5:302015-09-26T02:47:59+5:30

बलाढ्य भारतीय नौदलाने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना मध्य रेल्वेच्या दुबळ्या बचावाचा फायदा उचलून ५-० अशा दणदणीत विजयासह एमडीएफए एलिट गटात विजयी कूच केली.

The sounding of Indian Navy | भारतीय नौदलाचा दणदणीत विजय

भारतीय नौदलाचा दणदणीत विजय

Next

मुंबई : बलाढ्य भारतीय नौदलाने आपल्या लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना मध्य रेल्वेच्या दुबळ्या बचावाचा फायदा उचलून ५-० अशा दणदणीत विजयासह एमडीएफए एलिट गटात विजयी कूच केली. रियाद बी. याने शानदार दोन गोल करताना नौदलाच्या विजयात मोलाचे योगदाने दिले.
मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (एमडीएफए) वतीने कुपरेज स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नौदलाने वेगवान सुरुवात करताना मध्य रेल्वेला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. पी.एम. ब्रीटो याने १६व्या मिनिटाला गोल करून नौदलाला आघाडीवर नेले. या वेळी रेल्वेने बरोबरी साधण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र नौदलाचे भक्कम बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले. यानंतर आकाश कांबळेने ४५व्या मिनिटाला नोंदवलेल्या दुसऱ्या गोलच्या जोरावार नौदलाने मध्यांतराला २-० अशी आघाडी घेतली होती.
दुसऱ्या सत्रात मध्य रेल्वेकडून प्रतिकाराची अपेक्षा होती. मात्र नौदलाने आणखी आक्रमक पवित्रा घेताना रेल्वेच्या आव्हानातली
हवा काढली. रमन रायने ५३व्या मिनिटाला गोल केल्यानंतर रियादने आक्रमणाची सूत्रे आपल्याकडे घेतली. सामना संपण्यास काही मिनिटे शिल्लक असताना रियादने रेल्वेच्या क्षेत्रात मुसंडी मारताना ८७व्या आणि ९०व्या मिनिटाला
गोल करून संघाच्या ५-० अशा धमाकेदार विजयावर शिक्का मारला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: The sounding of Indian Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.