Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांनी राजीनामा दिला की नाही?; मातोश्रीवरुन आली महत्त्वाची माहिती

By मुकेश चव्हाण | Published: February 16, 2021 01:28 PM2021-02-16T13:28:39+5:302021-02-16T13:50:48+5:30

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे.

Sources on Matoshri have refuted all reports of Sanjay Rathore's resignation. | Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांनी राजीनामा दिला की नाही?; मातोश्रीवरुन आली महत्त्वाची माहिती

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांनी राजीनामा दिला की नाही?; मातोश्रीवरुन आली महत्त्वाची माहिती

Next

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असलेले राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवल्याचे वृत्त आहे. संजय राठोड यांचा राजीनाम्याबाबत सोमवारपासून विविध चर्चा सुरू होत्या. दरम्यान, या प्रकरणाच्या निष्पक्षपाती चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र न्यूज १८ लोकमतने दिलेल्या वृत्तानूसार, संजय राठोड यांच्या राजीनामा देण्याबाबतचे सर्व वृत्त मातोश्रीवरील सूत्रांनी फेटाळून लावले आहे. 

संजय राठोड (Sanjay Rathod)यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर पक्षात दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे. संजय राठोड यांनी राजीनामा देण म्हणजे आरोप मान्य करण्यासारखी गोष्ट असल्याचं राजीनाम्याला विरोध करणाऱ्या गटाचं मत आहे. संजय राठोड प्रकरणातून चुकीचा पायंडा पडू नये असं अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे मत मांडलं आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गेल्या आठवडभरापासून गायब असलेल्या संजय राठोड यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपाने अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. याचदरम्यान संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल- गृहमंत्री

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आता पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून होत आहे. मात्र संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत.

मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी

आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

कोण आहे पूजा चव्हाण?

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.

Web Title: Sources on Matoshri have refuted all reports of Sanjay Rathore's resignation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.