Join us

कोरोनाला हरविण्यात दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2020 5:23 PM

Corona News : त्रिसूत्रीचे पालन नागरिक करत आहे.

 

मुंबई : मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीची द्विशतकपूर्ती झाली असतानाच ४ विभागात ३०० पेक्षा अधिक तर ११ विभागात २०० पेक्षा अधिक दिवसांचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी नोंदवण्यात आला आहे. विशेषतः वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, धारावी, माहीम आणि दादर परिसरात रुग्ण आढळून येण्याचा कालावधी वाढला असून, या कामगिरी बाबत महापालिकेवर स्तुती सुमने उधळली जात आहेत.कोरोनाला हरविताना माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविली गेली. मास्कचा नियमित उपयोग होत आहे. हातांची वारंवार स्वच्छता राखणे व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येक नागरिक करत आहे. मुंबई महानगरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरु आहे. याचे फलीत आता समोर येत आहे. परिणामी मुंबईचा रुग्ण वाढीचा सरासरी दर देखील आता ०.३३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.असे असले तरी महानगरपालिका प्रशासनाने हुरळून न जाता कोविडला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनांमध्ये अधिकाधिक वेग देताना दिसत आहे. चेज द व्हायरस, मिशन झिरो, ट्रेसिंग-ट्रॅकींग-टेस्टींग-ट्रिटिंग या चतु:सूत्रीनुसार करण्यात येत असलेली कार्यवाही; भेटी, नागरिकांची पडताळणी, पोलीसांच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंध विषयक बाबी आणि मुंबई महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले आहे.----------------रुग्ण दुपटीचा कालावधी म्हणजे?संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी सदर बाब अधिक सकारात्मक असते. ही आकडेवारी एका आठवड्याच्या म्हणजेच ७ दिवसांच्या कालावधीच्या आकडेवारीचे केलेले सांख्यिकीय विश्लेषण असते.----------------रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने ३०० दिवसांचा टप्पा गाठलादादर ३५१परळ ३१६कुलाबा ३०८मरिन लाइन्स ३०६----------------रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने २०० दिवसांचा टप्पा गाठलाएल्फिन्स्टन २८३कुर्ला २४५भायखळा २४२भांडूप २३८ग्रँटरोड २३३माटुंगा २१३चेंबूर २०७अंधेरी २०७वांद्रे २०६खार २०३अंधेरी-पश्चिम २००----------------

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यालॉकडाऊन अनलॉक