'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 10:57 AM2024-05-12T10:57:51+5:302024-05-12T11:04:39+5:30

Rahul Shewale : दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कोरोना काळातल्या कामावरुन टीका केली आहे.

South Central Mumbai Loksabha candidate Rahul Shewale criticized Uddhav Thackeray for his work during Corona | 'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका

'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका

Mumbai South Central Loksabha: शिवसेनेच्या फुटीनंतर दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. लोकसभा निवडणुकीत पार्श्वभूमीवर आता दक्षिण मध्यचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे बोलत नाहीत अशी टीका राहुल शेवाळे यांनी केली आहेत. तसेच कोरोना काळात जगभरात गाजलेल्या धारावी मॉडेलचे श्रेय आपले असल्याचेही राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.

२० मे रोजी मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारासंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या टप्प्यात नागरिकांमध्ये जात प्रचार करण्यावर भर दिला आहे. दक्षिम मध्य मुंबईत ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. राहुल शेवाळे हे गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. महापालिकेतील नगरसेवक ते थेट खासदार असा त्यांचा प्रवास आहे. अशातच आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे यांनी कोरोना काळातल्या कामगिरीवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांसोबत संवाद साधला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली. "अडीच जागतिक कोरोना संकटाच्या काळात उद्धव ठाकरे आमच्या कुठल्या लोकांच्यासोबत उभे राहिले. मी स्वतः अडीच वर्ष कोरोना काळात दक्षिण मध्यच्या प्रत्येक वॉर्डात फिरलो. धारावी मॉडेल मी यशस्वी केलं. लोकांना लसीपासून रुग्णालयातपर्यंत सगळ्या सोई मी पुरवल्या आहेत. त्यामुळे एसीमध्ये बसलेल्या लोकांनी याचा उल्लेख करु नये. माझा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंना गल्लीबोळात फिरावं लागतंय यातच माझा विजय झालेला आहे," असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना काळात धारावी मॉडेलचं कौतुक केलं होतं. जगातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोनाचा फैलाव रोखण्यासाठी धारावी मॉडेल तयार करण्यात आलं होतं. यामुळे  दाट लोकवस्ती असूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यास मदत झाली होती.

Web Title: South Central Mumbai Loksabha candidate Rahul Shewale criticized Uddhav Thackeray for his work during Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.