मुंबई : छोटे पक्ष आणि अपक्षांचा भरमसाट भरणा असणारा मतदारसंघ म्हणून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. २०१४ च्या लढतीत १२ अपक्षांसह २१ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारांची संख्या मोठी असली तरी निकालाची आकडेवारी पाहता मतदारांचा कल राष्ट्रीय अथवा चर्चेतील पक्षांकडे असल्याचे जाणवते. या अपक्ष आणि छोट्या पक्षांपेक्षा मतदारांनी ‘नोटा’ला अधिक पसंती दिली.
एकूण मतदानापैकी ९५७१ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला. नोटाला मिळालेली ही मते सर्व १२ अपक्ष उमेदवारांपेक्षा जास्त आहेत. तर, समाजवादी पक्षासह अन्य चार छोट्या पक्षांनाही नोटापेक्षा कमी मते मिळाली. यापैकी आठ उमेदवारांना तर एक हजार मतेही मिळविता आली नाहीत. मतदारांनी शिवसेना, काँग्रेस, मनेस, बसपा आणि आप या पाच पक्षांच्या उमेदवारांनाच नोटापेक्षा अधिक मते मिळाली. यंदाही मुख्य पक्षांकडेच मतदारांचा कल असण्याची शक्यता आहे. प्रचारात यंदा सर्वच पक्षांनी कंबर कसली़ अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भव्य रोड शेचे आयोजन राहुल शेवाळे व एकनाथ गायकवाड यांनी केले होते़ या काळात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती असे उत्सव झाले़ त्याचा फायदा घेत उमेदवारांनी मंडळांनाही भेटी दिल्या़ त्यांना मदत केली़ त्यामुळे निकालाचा कौल कोणाकडे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
नोटा म्हणजे काय?जर ईव्हीएम मशीनवर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर नोटाला मत देऊ शकता. त्यासाठी सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणत्याच उमेदवाराला ते मत मिळत नाही.
6,23,836 दोन प्रमुख उमेदवारांना गेल्या निवडणुकीत मते मिळाली. शिवसेनेच्या राहुल शेवाळेंना 3,81,008 तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना 2,42,828 मते मिळाली होती.
उमेदवार पक्ष मते। अब्बास हुसेन शेख सप ५,५७३। अस्लम हनिफ खोत पीईसीपी १,०१६। संगपाल गाडेकर एपीओएल ०,९१९। हुसेन अकबर सय्यद बीएमयूपी १,४३०। सिलीफोर्ड मार्टीस अपक्ष ०,७९९। खान सिराज अहमद अपक्ष ०,५४५। गणेश बुधे अपक्ष ०,५१४। नोटा नोटा ९,५७१