Join us

‘खेलो इंडिया’ला दक्षिण मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 2:46 AM

नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मुंबईत ‘खेलो इंडिया’ उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मुंबईत ‘खेलो इंडिया’ उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला असून गिरगाव, खेतवाडी, प्रार्थना समाज, ताडदेव, तुळसीवाडी, वाळकेश्वर, महालक्ष्मी यासारख्या परिसरातील सुमारे ३० हजारहून अधिक हौशी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.मलबार हिल भाजपा आणि लोढा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या मेगा स्पोटर््स आणि कल्चरल इव्हेंटच्या उद्घाटनाच्या दिवशी सुमारे साडेतीनशे कुटुंबांतील मुलांनी सहभाग घेतला. या उपक्रमातील सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देत प्रमुख आयोजक आ.मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईकरांचे आभार मानले. गिरगाव चौपाटीवरील मफतलाल स्वीमिंग कॉम्प्लेक्समध्ये या उपक्रमाचे उद्घाटन झाले. त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर या उपक्रमामध्ये मातृवंदनेचा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यातयेणार असल्याची माहिती आयोजकांनीदिली.आगामी २० दिवस रंगणाऱ्या या उपक्रमामध्ये खुल्या स्पर्धा रंगणार असून यामध्ये बुद्धिबळ, मुष्टियुद्ध, गोळाफेक, लांब उडी, तायक्वांदो, टेबल टेनिस, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल, जलतरण, बॅडमिंटन, १०० मीटर स्प्रिंट, कॅरम, कबड्डी या क्रीडा स्पर्धांसह समूह नृत्य, गीता पठन, हास्य स्पर्धा, गायन, हेल्दी बेबी, प्लांट शो अशा स्पर्धाही रंगतील. तसेच, महिलांसाठी पाककला, मेहंदी, कबड्डी आणि रांगोळी या विशेष स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.