मुंबई : मराठा क्रांती मोर्चामुळे दक्षिण मुंबईतील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. बुधवारी पूर्ण दिवस शाळा बंद असल्याने, तो दिवस भरून काढण्यासाठी दक्षिण मुंबईतील शाळा शनिवार आणि रविवारी सुरू राहणार आहेत.९ आॅगस्टला झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी दक्षिण मुंबईत लाखो मोर्चेकरी दाखल झाले होते. लाखोंच्या संख्येने मोर्चेकरी येणार असल्यामुळे, वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास होऊ नये, म्हणून शाळा बंद ठेवण्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले होते, पण शिक्षण विभागाने हा शैक्षणिक दिवस भरून काढायचे निर्देश दिले होते.या निर्देशानुसार, दक्षिण मुंबईतल्या महापालिकेच्या शाळा रविवार, १३ आॅगस्टला पूर्ण दिवस सुरू राहणार आहेत.
दक्षिण मुंबईतल्या शाळा शनिवार, रविवारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 4:08 AM