सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे सोयाबीन पेरा वाया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 04:45 AM2020-06-22T04:45:08+5:302020-06-22T04:45:15+5:30
पंचनामे करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी किसान सभेने केली आहे.
मुंबई : सोयाबीनचे सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे सोयाबीन पेरा वाया गेल्याच्या गंभीर तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पंचनामे करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी किसान सभेने केली आहे.
याबाबत किसान सभेचे
डॉ. अजित नवले म्हणाले की, सदोष बियाणांमुळे उगवण न झालेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची आहे. मात्र लेखी तक्रार करूनही कृषी विभागाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकºयांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे.
राज्य सरकारने आता तरी याबाबत गांभीर्याने हस्तक्षेप करावा. वाया गेलेल्या पेºयाच्या शेतात शेतकºयांना दुबार पेरणी करायची असल्याने अशा शेतांचे तातडीने पंचनामे करावेत. दोषींवर कारवाई करावी तसेच शेतकºयांना संबंधित कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.