Join us

सपा अजूनही कॉग्रेसबरोबर आघाडीसाठी आशावादी

By admin | Published: September 21, 2014 2:01 AM

कॉँग्रेसने आघाडीत समाविष्ट करुन घेण्याच्या समाजवादी पार्टीच्या प्रस्तावावर अद्यापपर्यत कसलाही प्रतिसाद दिला नसलातरी ते अजुनही त्यासाठी आशावादी आहेत.

मुंबई : कॉँग्रेसने आघाडीत समाविष्ट करुन घेण्याच्या  समाजवादी पार्टीच्या प्रस्तावावर   अद्यापपर्यत कसलाही प्रतिसाद दिला नसलातरी ते अजुनही त्यासाठी आशावादी आहेत. मात्र कॉँग्रेस आघाडीवर दबाव टाकण्यासाठी निवडणूक लढविणार असलेले मतदारसंघ जाहीर करण्याचा पवित्र त्यांनी घेतला आहे. 
 सपाने कॉँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी न झाल्यास सर्व 288 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून आतापर्यत  23 जागा जाहीर केल्या आहेत. पक्षाचे प्रदेश महासचिव व प्रवक्ते अब्दुल कादीर चौधरी यांनी ही माहिती दिली.  कॉंग्रेसने आघाडीत समाविष्ट करुन न घेतल्यास मानखुर्द-शिवाजी नगर, विक्रोली, मुंब्रा-कलवा,दिंडोशी,बांद्रा (प),कालिना, भायखला,चारकोप,  दहिसर, मागाठाणो, भांडूप, कांदिवली, बालापूर, अकोला (पश्चिम), अकोट, परतूर, नागपूर (पूर्व), मुतर्जापुर, धुले, मालेगाव, नवापुर, एरंडोल, रावेर, जळगाव (शहर), उदगीर, औरंगाबाद (मध्य), औरंगाबाद (पूर्व), गंगापूर, कुर्ला, बांद्रे (पूर्व), मुंबादेवी, वर्सोवा, भिवंडी (पूर्व) व  भिवंडी (पश्चिम), या ठिकाणचे उमेदवार निश्चित केले आहेत. मात्र धर्मनिरपेक्ष मताची विभागणी होवून त्याचा फायदा सेना-भाजपासारख्या  जातीयवादी पक्षाच्या उमेदवारांना फायदा मिळू नये, यासाठी अजुनही आम्ही आघाडी करण्यासाठी प्रय}शील आहोत, त्यामुळे उमेदवारांना ए,बी, फॉर्म दिलेला नाही. कॉँग्रेससोबत एकत्र निवडूणूक लढविण्यास तयार असल्याचे प्रय} सुरु असल्याचे चौधरी यांनी सांगितले.  (प्रतिनिधी)