मुंबई : मुंबईत बुधवारी सकाळी साडेआठ वाजता ५८ मिमी पावसाची नोंद झाली असून, ३ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. १७१ ठिकाणी झाडे कोसळली. १४ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. शहरात ३१, पूर्व उपनगरात २४ तर पश्किम उपनगरात ११६ अशी एकूण १७१ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी थांबून थांबून कोसळत होता. सकाळी ११ वाजता दुपारी ३ वाजता मुंबईत बहुतांश ठिकाणी ऊन पडले होते. सायंकाळी काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, ७ जुलै रोजी दुपारी १ वाजता भांडुप येथील उषा सदन चाळ येथील घराहून जाणाऱ्या हायटेंशन वायरमधून स्पार्क झाला.या घटनेत स्वप्नील होलारे हे ४० टक्के भाजले. तर कल्पना पवार या किरकोळ भाजल्या. होलारे यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, कल्पना पवार यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.कुर्ला भुयारी मार्गात पाणी साचल्याने पादचाऱ्यांचे हालमुंबई : कुर्ला पूर्व आणि पश्चिम विभागांना जोडणा-या भुयारी मार्गात पाणी साचले असल्याने पादचा-यांचे हाल होत आहेत. मागील अनेक दिवस या भुयारात पाणी साचल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.कुर्ला रेल्वे स्थानकाच्या खालून जाणाºया या भुयारी मार्गातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अनेकदा या भुयारातील काही दिवे बंद असतात. तर काही वेळेस अनधिकृत फेरीवाले व गर्दुल्ले या भुयारात वास्तव्य करतात. यामुळे भुयारात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. परंतु अनेक दिवस या पाणी साचण्याच्या समस्येकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. पाणी साचत असल्याने काही नागरिक रेल्वे पुलावरून ये-जा करत आहेत. तर काही जण थेट रेल्वे रूळ ओलांडत आहेत. अवघ्या तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या भुयारी मार्गातील या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत असल्याने भुयारी मार्गाच्या बांधकामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या भुयारातील साचणाºया पाण्याची समस्या पालिकेने लवकर सोडवावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. अवघ्या तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या भुयारात साचत असलेल्या पाण्याची समस्या पालिकेने लवकर सोडवावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
मुंबईत तुरळक मुसळधारा; १७१ ठिकाणी झाडे कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 2:24 AM