बोलो साब, कौनसा ‘माल’ चाहिए?
By admin | Published: February 6, 2016 02:46 AM2016-02-06T02:46:42+5:302016-02-06T02:46:42+5:30
गोवंडी पश्चिमेकडील बैंगनवाडी. देवनार डम्पिंग बाजूलाच असल्याने सातत्याने कचऱ्याचा दर्प. गंजलेल्या भंगाराचा वास आणि रस्त्यालगतची धूळ वातावरणात मिसळलेली
गोवंडी पश्चिमेकडील बैंगनवाडी. देवनार डम्पिंग बाजूलाच असल्याने सातत्याने कचऱ्याचा दर्प. गंजलेल्या भंगाराचा वास आणि रस्त्यालगतची धूळ वातावरणात मिसळलेली. अशाच काहीशा उग्र वातावरणात ‘रईस शेख’ प्रवेशद्वारातून बैंगनवाडीत पोहोचलो.
अरुंद गल्ल्यांत ड्रग पेडलर्सच्या अवतीभोवती जमा झालेली ‘गर्दुल्ल्यां’ची गर्दी पाहून परिसरालाच नशा चढल्यासारखे वाटत होते. टीम लोकमत ल्ल मुंबई
आडोशाला उभे राहिलेले ड्रग्ज पेडलर लक्ष वेधून घेत होते. अंगावर मळकट बनियान, कंबरेला लुंगी नाही तर मग अगदीच भडक रंगाची थ्री-फोर्थ. विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावरचे विचित्र हावभाव. अशाच काहीशा आवेशात लगतच्यांना हात मिळवत ‘सलाम वाले कूं...’ म्हणणारे पेडलर गल्ल्यांमधून हिंडत होते. त्यांच्याकडून अमली पदार्थांची खरेदी करणाऱ्यांचा अवतारही काहीसा तसाच. आजूबाजूला चिल्लीपिल्ली आणि फेरीवाले. फेरीवाल्यांचे लक्ष आपल्या धंद्यापेक्षा पेडलरच्या गिऱ्हाइकाकडेच जास्त. नवख्या माणसांवर वॉच. त्याला खाणाखुणाही करणार. लागलाच हाताला तर लागला, नाही तर मग तो नाक्यावरून हटेपर्यंत संशयास्पद नजरेने त्याची कोंडी करणार.
आदर्शनगर असो वा बैंगनवाडी. रस्त्यावरच्या नाक्यासमोरील अरुंद बोळात हे पेडलर कायमच दबा धरून बसलेले. गिऱ्हाइकावर नजर ठेवण्यासाठी त्यांचे आणखी चार ते पाच पंटर. कदाचित तेही पेडलर. महिलांवर कोण संशय घेणार म्हणून त्यांचाही समावेश. पेडलरची पाळेमुळे खोलवर गेलेली. पोलीसही दुचाकीवरून सतत फेरी मारतात. पण त्यांच्याकडूनही केवळ राउंडवर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न. आगीतून फुफाट्यात कोण जाणार, हा प्रश्न त्यांना पडत नसेल तर नवलच. असेच काहीसे वातावरण येथे दररोज; तेही तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्यासाठी, मुंबईला खंगवून टाकण्यासाठी.
रे रोडवर
बिनदिक्कत धंदा
रे रोड स्थानकाच्या पश्चिमेला बाहेर पडल्यावर लागणाऱ्या उड्डाणपुलाखालीच उघडपणे अमली पदार्थ विक्रीचा धंदा सुरू आहे. शेजारच्या झोपडपट्टीवासीयांनाही या धंद्याची पुरेपूर कल्पना आहे. जणू काही लिमलेटच्या गोळ्या विकल्याप्रमाणे चरसच्या गोळ्या विकल्या जातात. अगदी १८ ते २५ वयोगटातील तरुण या धंद्यात गुंतलेले आहेत. रे रोडमध्ये या धंद्यात एक आंटी मुख्य तस्कर आहे. रस्त्यावर खाट टाकून तिची मुले व त्यांचे पंटर्स धंदा चालवतात. विशेष म्हणजे अवघ्या काही अंतरावर भायखळा पोलीस बिट चौकी आणि शिवडी न्यायालय आहे.
मानखुर्द, गोवंडीत अड्डे
गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात रफिकनगर, बैंगनवाडी, संजयनगर, ट्रान्झिट कॅम्प, ९० फीट रोड या परिसरातील झोपड्यांमध्ये खुलेआमपणे ड्रग्ज मिळतात. मानखुर्दमधील मंडाला, पीएमजी कॉलनी आदी ठिकाणी अमली पदार्थांचा धंदा तेजीत आहे. काही किराणा दुकानदारदेखील हा माल दुकानात ठेवत असून ग्राहकांच्या मागणीनुसार ते काही सेकंदात माल उपलब्ध करून देतात.
(माहीतगारासोबत गेलेल्या रिपोर्टरचा पेडलरशी झालेला संवाद)
रिपोर्टर : इधर क्या मिलेगा?
माहीतगार : इधर पुडी (गांजा) मिलेगा
रिपोर्टर : कितने
लोग है बेचने वाले
इस एरिया मे?
माहीतगार : हर तिसरे गली मे पुडी बेचनेवाले है, जादा तर औरते बेचती है. लेकिन उनपर ध्यान रखने के लिए हर नुक्कडपर भाई लोग रहते है
(माहीतगार दोन-तीन गल्ल्या पार केल्यानंतर एका झोपडीजवळ थांबला. थोडा वेळ तेथे घुटमळल्यानंतर एक महिला पुढे आली)
रिपोर्टर - कौनसे
समय में सबसे ज्यादा आता है माल?
माहीतगार - रमजान के समय में सबसे ज्यादा माल आया था...
रिपोर्टर : पुडी हैं क्या?
पेडलर महिला : कितनी चाहिए?
रिपोर्टर : एक पुडी
पेडलर महिला : यहीं पे रुक दो मिनिट...
(एवढे सांगून ती महिला शेजारच्या झोपडीत गेली आणि हातात पुडी घेऊन आली. १०० रुपयांची नोट घेऊन ३० रुपये परत करत पुन्हा घराकडे वळली.)रिपोर्टर : इधर कौनसा
माल मिलेगा? और
कितना पैसा लगेगा?
माहीतगार : भाई चरस की
गोली मिलेगी... एक पव्वा ३५०
रुपये का है... भाव मत करना,
नही तो भगा देंगे...
रिपोर्टर : कितने लोग
बेचते है? और जादा
भीड कब होती है?
माहीतगार : दो
ग्रुप है, लेकिन
एकही जगह पर बेचते है!
शनिचर को जादा भीड होती हैं,
जनवरी मै तो ता-ता लगा था.
उस वक्त पैदल शिर्डी जानेवाले
ग्रुप मेंसे कुछ लोग सात-आठ
दिन का माल एकसाथ लेके
जाते हैं!
(माहीतगारासोबत रिपोर्टर
पॅडलरकडे गेला. अवघ्या
१८ ते २५ वयोगटातील तीन तरुण
खाटेवर बसले होते. त्यांचे कपडे
एकदम भडक रंगाचे मात्र
मळलेले.)
रिपोर्टर : भाई, गोली है क्या?
पॅडलर : है ना, कितनी चाहिए?
रिपोर्टर : फिलाल एक दे-दो.
पॅडलर : ३५० रुपया. नए हो क्या?
रिपोर्टर : तीन-चार गोली
और दिखाओ ना?
पॅडलर : क्यों, कितनी चाहिए?
रिपोर्टर : एकही चाहिए, मगर
गोली का कट देखना था!
पॅडलर : रहने दे. एक भी मत ले...
रिपोर्टर : अरे भाई नाराज मत हो. चल दे-दे.
(त्यानंतर शेजारीच खुर्च्या लावून २५ ते ३० वयोगटातील हट्टेकट्टे तरुण अमली पदार्थ विक्री करण्यास बसले होते.)
रिपोर्टर : भाई, कडक माल है क्या?
पॅडलर : अपने पास लुख्खा माल मिलता नही...
रिपोर्टर : तेरी गोली बडी है यार.
पॅडलर : छोटा माल मैं बेचता नही!
(आधीच्या विक्रेत्याहून ही
गोळी मोठी असल्याचे सांगताच
मालात फरक असल्याचे सांगत त्याने
नंतर घेतलेली गोळी दाबून दाखवली.
गडद कॉफी रंगाची चॉकलेटएवढी वडी होती. ही चरसची गोळी असल्याचे माहीतगाराने स्पष्ट केले.)रिपोर्टर : सलाम वाले कूं.
माहीतगार : वाले
कूम अस्सलाम.
रिपोर्टर : पंटर किधर
है. पावडर मंगताय.
माहीतगार : दोपहार का वक्त है. अभी नही मिलेगा.
रिपोर्टर : पिछलेवाले गली मे मिलेगा ना?
माहीतगार : नही भाय. ओ लोग बहोत शाने है. एक जगा पर रुकते नही. आपको क्या चाहिए. छोटा फोर स्क्वेअर या बडा?
रिपोर्टर : किधर मिलेगा और पानी भी चाहीए
माहीतगार : ओ सामनेवाले दुकानमे.
(संवाद सुरू असतानाच समोरच्या नाक्याहून एक पेडलर मळका टी-शर्ट आणि थ्री-फोर्थवर तीन ते चार लोकांसोबत जाताना दिसला. त्याला पाहताच माहीतगार रिपोर्टरच्या कानात कुजबुजला.)
माहीतगार : ओ देखो. वही है. मगर अभी नही देगा
रिपोर्टर : और ऐसे
कितने है?
माहीतगार : मालूम नही साहब. सौ हो सकते है या उससे भी जादा. दो सौ भी हो सकते है.
रिपोर्टर : ये सब लोग का बॉस किधर है?
माहीतगार : वो, अण्णा. अभी वो इधर
नही है. लोग बोलते है
वो तडीपार है. उसके
उपर बहोत सारे केसेस है. अण्णा तो खाली नाम के लिए है साहब. और ऐसे कितने बॉस है पता भी नही चलता.
रिपोर्टर : ठीक है.
फिर मिलेंगे.
माहीतगार : संभल के
जाना साब.रिपोर्टर : नशे के
लिए क्या मिलेगा?
माहीतगार : कोरेक्स है! ३०० रुपये रेट है, लेकिन पेहचान वालो को २०० मे दे देगा!
पेडलर : बोलो भाई,
आज क्या चाहिए?
माहीतगार : अपना दोस्त आया है, रे रोड से, उसे कोरेक्स चाहिए!
पेडलर : मिल
जाएगा ना भाई!
रिपोर्टर : थोडा
पानी मिलेगा?
पेडलर : मिलेगा ना भाई!
रिपोर्टर : माल असली है ना?
पेडलर : भाई के साथ आये हो, असली चीज ही दुँगा! दोस्त बुरा मत मानो, लेकिन भाई थोडा साइड में चलना पडेगा!