बहिणीसोबत फोनवर बोलला म्हणून तरुणावर हल्ला

By admin | Published: January 15, 2017 02:04 AM2017-01-15T02:04:29+5:302017-01-15T02:04:29+5:30

वारंवार बजावूनदेखील बहिणीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून, २१ वर्षांच्या तरुणावर चाकूने हल्ला चढविल्याची घटना वडाळ्यात घडली. या प्रकरणी २२ वर्षांच्याराजू चव्हाण

Speaking on the phone with the sister said the attack on the youth | बहिणीसोबत फोनवर बोलला म्हणून तरुणावर हल्ला

बहिणीसोबत फोनवर बोलला म्हणून तरुणावर हल्ला

Next

मुंबई : वारंवार बजावूनदेखील बहिणीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून, २१ वर्षांच्या तरुणावर चाकूने हल्ला चढविल्याची घटना वडाळ्यात घडली. या प्रकरणी २२ वर्षांच्याराजू चव्हाण याला वडाळा टी. टी. पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
अनिल आयोध्याप्रसाद मिश्रा (२१) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडाळा पूर्वेकडील म्हाडा संक्रमण शिबिरात तो कुटुंबीयांसोबत राहातो. याच परिसरात राहाणाऱ्या तुळशी चव्हाणसोबत त्याची ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, दोघांच्या प्रेमसंबंधाला तुळशीचा भाऊ राजूचा विरोध होता. त्यामुळेच तुळशी गावी उत्तर प्रदेशला निघून गेली, तरीही फोनवरून ते दोघे संपर्कात होते. तुळशीच्या भावाने अनिलला फोन करू नये, म्हणून बजावले होते.
मात्र, वारंवार सांगूनदेखील अनिल तुळशीसोबत बोलत असल्याची माहिती त्याला मिळाली. रात्री पावणेतीनच्या सुमारास अनिल बहिणीसोबत बोलत असल्याची माहिती राजूला मिळाली. याच रागातून त्याने चाकूने त्याच्या गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रक्ताच्या थारोळ्यात सोडून तो पसार झाला. स्थानिकांच्या मदतीने अनिलला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Speaking on the phone with the sister said the attack on the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.