मध्य रेल्वेवर आज ६ तासांचा विशेष मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 06:04 AM2018-11-18T06:04:47+5:302018-11-18T08:35:34+5:30

मध्य रेल्वेमार्गावरील कल्याण येथील ब्रिटिशकालीन पत्रीपूल रविवारी पाडण्यात येणार आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या ६ तासांमध्ये हे काम करण्यात येणार आहे.

 A special 6-hour special megablock on the Central Railway today | मध्य रेल्वेवर आज ६ तासांचा विशेष मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर आज ६ तासांचा विशेष मेगाब्लॉक

Next

मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील कल्याण येथील ब्रिटिशकालीन पत्रीपूल रविवारी पाडण्यात येणार आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या ६ तासांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात कल्याण-डोंबिवली स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नसल्याने रस्ते वाहतुकीवर ताण येणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमटी, एसटी आणि वाहतूक पोलिसांनी तयारी केली आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली तसेच कल्याण ते कसारा-कर्जतदरम्यान रेल्वेची वाहतूक सुरू राहणार आहे.



- ब्लॉकदरम्यान उपनगरीय गाड्या कल्याण आणि कर्जत-कसारादरम्यान धावतील
- विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि डोंबिवली/ ठाणेदरम्यान चालवण्यात येतील
- सीएसएमटी, दादर आणि कुर्ला, घाटकोपर, ठाणे आणि डोंबिवलीदरम्यान सेवा वेळापत्रकानुसार चालतील
- सीएसएमटी येथून शेवटची फास्ट ट्रेन कर्जतसाठी सकाळी 8.16 वाजता आणि कल्याणसाठी सकाळी 9.18 वाजता सुटेल
- दादर स्थानकाहून स्लो ट्रेन ही टिटवाळासाठी सकाळी 8.07 वाजता आणि कल्याणसाठी  9.17 वाजता सुटेल
- सीएसएमटीसाठी शेवटची फास्ट ट्रेन आणि अप ट्रेन सकाळी 9.09 वाजता कल्याणावरुन सुटेल
- सीएसएमटीसाठी शेवटची स्लो ट्रेन आणि अप ट्रेन सकाळी 9.13 वाजता कल्याणवरुन सुटेल

रद्द करण्यात आलेल्या गाड्या 
1. मनमाड-एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस 
2. मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस 
3. भुसावळ-मुंबई पॅसेंजर
4. मनमाड-सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस 
5. पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस
6. पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन
7. जालना-दादर-जालना-जनशताब्दी एक्स्प्रेस
8. मुंबई-भुसावळ पॅसेंजर 19 नोव्हेंबर रोजी रद्द असेल

Web Title:  A special 6-hour special megablock on the Central Railway today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.