मुंबई : मध्य रेल्वेने श्रीगणेश उत्सवानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि कुडाळदरम्यान वातानुकूलित विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा असून, कोरोना नियमांचे पालन आवश्यक आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून विशेष वातानुकूलित गाडी ७ ते १० सप्टेंबर रोजी ०४.३५ वाजता सुटेल आणि कुडाळला त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल. कुडाळ येथून विशेष वातानुकूलित गाडी ७ ते १० सप्टेंबर रोजी १५.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग येथे थांबणार आहे.