मुंबई : कोविड रुग्णसेवा सतत बदलत आहे, तपासण्यांसाठी फिरावे लागू नये यासाठी नायर रुग्णालयात अभिनव प्रयोग सुरू केला आहे. इथे सुरूकेलेल्या अॅम्ब्युलन्स बे या ठिकाणी स्वॅब, रक्त तपासणी आणि एक्सरे या सर्व तपासण्या होणार आहेत. कोविड आजारातील ही आपत्कालीन सेवा असल्याचे नायर रुग्णालयातील डॉ. विशाल रख यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळातच अॅम्ब्युलन्स बे ही अत्यावश्यक सेवा सुरू केली. अचानक उद्भवलेल्या चक्रीवादळ स्थितीत सुरू असलेली कोविड ओपीडी प्रभावित होणार असल्याने हा विभाग तासाभरातच त्वरित सुरू करण्यात आला. या ठिकाणीही पाणी साचेल असे गृहीत धरूनच येथे १ ते दीड फूट उंचीचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. कित्येक वेळा अत्यवस्थेत येणारा कोविड रुग्ण रुग्णवाहिकेतच तपासला जात होता. आता रुग्णाला अॅम्ब्युलन्स बे आपत्कालीन विभागात घेऊन कोविड तपासणी केली जाईल. या ठिकाणी ओपीडी ते व्हेंटिलेटर अशा सुविधा तत्पर ठेवण्यात आल्या आहेत.दरवर्षी उघडण्यात येणाऱ्या ओपीडीच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचते याची कल्पना असल्याने उंची वाढवण्यात आली. महिनाभर आधीच झालेल्या पावसाळी तयारी बैठकीत याचा विचार ठरला असल्याचे डॉ. रख सांगतात.वैशिष्ट्यच्१५ खाटा व प्रत्येक खाटेजवळ आॅक्सिजन सिलिंडरच्अत्यवस्थेत आणलेला रुग्ण इथे स्थिर करून वॉर्डात पाठवणारयाआधी रुग्ण दाखल झाल्यावर एका ठिकाणी स्वॅब, दुसºया ठिकाणी एक्सरे तर तिसºया ठिकाणी रक्त तपासणी अशा विविध तपासणींसाठी रुग्णाला फिरावे लागत असे. अॅम्ब्युलन्स बे अत्यवस्थ वॉर्डात मात्र सर्व तपासणी एकाच ठिकाणी होणार आहे. रुग्णाला स्थिर करूनच वॉर्डात पाठवण्यात येईल.- डॉ. विशाल रख,नायर रुग्णालय