सिद्धिविनायक मंदिरात १ जानेवारीनिमित्त भाविकांना दर्शनासाठी विशेष नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:08 AM2020-12-31T04:08:15+5:302020-12-31T04:08:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी, २०२१ निमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना दर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी, २०२१ निमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना दर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. नवीन वर्षानिमित्त अनेक भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गर्दी करत असल्याने मंदिर न्यासाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला.
बाप्पाच्या दर्शनासाठी याआधी दर तासाला २५० जणांना ऑनलाइन आरक्षण देण्यात येत होते. सद्यस्थितीला भाविकांच्या सुविधेसाठी तासाला ८०० क्यूआर कोड आरक्षित करता येणार आहेत. क्यूआर कोड आरक्षित केलेल्या भाविकांनाच दर्शन घेता येईल. त्यांना रिद्धी आणि सिद्धी प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाईल. ऑनलाइन क्यूआर कोड अहस्तांतरणीय असल्याने इतर कोणतीही प्रत प्रवेशाच्या वेळी स्वीकारली जाणार नाही.
सिद्धिविनायक मंदिर सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील. दुपारी १२ ते १२.३० नैवेद्याची वेळ असल्याने, तसेच सायंकाळी ७ ते ८ ही आरतीची वेळ असल्याने या वेळेत मंदिर बंद असेल.
..............................