बालकर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय ठरतेय वरदान

By स्नेहा मोरे | Published: May 7, 2022 03:26 AM2022-05-07T03:26:28+5:302022-05-07T03:31:48+5:30

कर्करोग म्हटले की, अनेकजण हवालदिल होतात. या आजारातून बरे होता येत असले तरीही भीती कायम मनात घर करून राहते.

special article on Tata Hospital is a boon for pediatric patients | बालकर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय ठरतेय वरदान

बालकर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय ठरतेय वरदान

googlenewsNext

स्नेहा मोरे 

कर्करोग म्हटले की, अनेकजण हवालदिल होतात. या आजारातून बरे होता येत असले तरीही भीती कायम मनात घर करून राहते. या आजारातून बरे होण्याची खात्री असो वा नसो, डॉक्टर्स, रुग्ण, नातेवाईक अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहतात. टाटा रुग्णालय आणि तेथील संस्था आदर्श उपचारांचे अंतिम उदाहरण म्हणता येईल, अशा आहेत. रुग्ण वाचणार नाही हे लक्षात आल्यानंतर नातेवाईक रुग्णांना वाऱ्यावर सोडून देता. पण, डॉक्टर त्यांचे प्रयत्न सोडत नाहीत. तीन भागांच्या या मालिकेतून ‘ दुःख विसरताना’चे प्रयत्न मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.

लहानग्यांमध्ये असणाऱ्या कर्करोगाचे वेळीच निदान झाले, तर हा कर्करोग बरा होता. मागील काही वर्षांत परळ येथील टाटा रुग्णालयात बालकर्करोग रुग्णांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. मात्र, टाटा रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या सेवांचे सुयश म्हणजे २०१० ते २०२२ या काळात बालकर्करोग रुग्णांकडून उपचार अर्धवट सोडण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. 

बऱ्याचदा टाटा रुग्णालयात येणाऱ्या बालकर्करोग रुग्णांपैकी अनेक जण अर्धवट उपचार सोडून देतात. त्यामागे सामाजिक, आर्थिक व मानसिक अनेक कारणे असतात. मात्र, टाटा रुग्णालयातील बालकर्करोग उपचार अर्धवट सोडून देण्याच्या प्रमाणात झालेली कमालीची घट ही दिलासादायक आहे.

 २०१० मध्ये टाटा रुग्णालयात १,१३१ नव्या बालकर्करोग रुग्णांची नोंद झाली. त्यात ७३४ मुले, तर ३९७ मुलींचा समावेश होता. त्यातील ६६ बालकर्करोग रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले, हे प्रमाण ५६ टक्के होते. त्यानंतर आता २०२१ मध्ये हे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. २०२१ मध्ये टाटा रुग्णालयात १,१७६ नव्या बालकर्करोग रुग्णांची नोंद झाली. त्यात १,१३५ मुले, तर ६४१ मुलींचा समावेश आहे. त्यातील २१ रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले, हे प्रमाण ६७ टक्के आहे. 

 वर्ष    नवे रुग्ण   उपचार सोडलेले   टक्के 
        
 २०१०    ११३१         ६६        ५६ 
 २०११    १२२२         ३१        ४८     
 २०१२    १२९१         १५        २१ 
 २०१३    १६१६         २१        २८ 
 २०१४    १५८५         १९        १५ 
 २०१५    १८३२         २१        १५ 
 २०१६    १७९५         २१        ३० 
 २०१७    १९७२         ११        १५
 २०१८    २०३५         २६        ३५
 २०१९    २०८१         १३        २५ 
 २०२०    ११८९         ३०        ६८ 
 २०२१    १७७६         २१        ६७
 २०२२    ६५८        ०१        २५

 ल्युकेमियाचे सर्वाधिक रुग्ण 

  • मागील काही वर्षांपासून टाटा रुग्णालयात बालकर्करोग रुग्णांचे प्रमाण वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. 
  • या रुग्णालयात दरवर्षी १५ वर्षांखालील २,८०० नवीन रुग्ण दाखल होतात, तर अठरा वर्षांखालील नवीन बालकर्करोग रुग्णांची संख्या साडेतीन हजारांच्या घरात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 
  • लहान मुलांमध्ये रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया आणि लिम्फोमा) सर्वांत जास्त प्रमाणात आढळतो. याव्यतिरिक्त मेंदूचा, मूत्रपिंडाचा, यकृताचा, हाडांचा असा इतर अवयवांचाही कर्करोग होऊ शकतो, अशी माहिती टाटा रुग्णालयातील बालकर्करोगतज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांनी दिली.

नव्या वर्षात प्रमाण २५ टक्क्यांवर 

  • जानेवारी ते एप्रिल २०२२ या दरम्यान टाटा रुग्णालयात ६५८ नव्या बालकर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे. 
  • ४४० मुले आणि २१८ मुलींचा समावेश आहे. त्यातील केवळ एका रुग्णाने अर्धवट उपचार सोडले आहेत, हे प्रमाण २५ टक्के असल्याची माहिती टाटा रुग्णालय प्रशासनाने दिली. 

Web Title: special article on Tata Hospital is a boon for pediatric patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.