मुंबई :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन चुकीची माहिती पसरविणाऱ्या ‘फेक न्यूज’वर विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे कोणीही चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आपले आहे.
निवडणुकीच्या काळात विविध ऑफरसह चुकीचे संदेश व्हायरल होत आहे. नागरिकांनीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या काळात सायबर पोलिस सोशल हालचालीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कुठलीही पोस्ट खातरजमा केल्याशिवाय पोस्ट करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हे शब्द टाळावेजे अपशब्द जातीवाचक उल्लेखातून असतात असे शब्द टाळावे. ज्या शब्दातून एकापेक्षा अधिक धार्मिक किंवा जातीच्या समूहात वितुष्ट निर्माण होऊन सलोखा बिघडण्याची शक्यता असते ते शब्द टाळावेत.
उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा इशाराया नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा नोंद करत कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.येथे करा तक्रारकोणीही अफवा व खोट्या बातम्या व्हॉट्स्ॲप किंवा अन्य समाज माध्यमांवर पसरवू नयेत, तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. काही मदत लागल्यास जवळच्या पोलिस स्टेशनकडे संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांबाबतची माहिती www.cybercrime.gov.in वर पाठवावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
व्हॉट्सॲप ॲडमिनसाठी नियमावली नियमावलीनुसार सदस्यांनी व्हॉट्सॲप समूहात अफवा, चुकीची माहिती किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा मजकूर, छायाचित्र किंवा ध्वनिचित्रफित पाठवू नये. त्यासोबत खात्री नसलेले साहित्यही समूहावर पोस्ट करणे टाळावे. अशाप्रकारचे साहित्य समूहात आल्यास डिलीट करावे, ते जसेच्या तसे पुढे पाठवू नये. याशिवाय एखाद्या समाजाचे किंवा धर्माविरोधातील साहित्य, पॉर्न साहित्य समूहावर पाठवू नये. ग्रुप ॲडमिनने वेळोवेळी समूहातील घडामोडींवर लक्ष ठेवावे. समूह नियंत्रणाबाहेर जात असेल तर प्रमुखाने सदस्यांचे हक्क काढून घ्यावा आणि समूहावर साहित्य पाठवण्याचा हक्क फक्त स्वत:कडे घ्यावा. समूहावरील आक्षेपार्ह मजकूराबाबत तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे सायबर पोलिसांनी वेळोवेळी नमूद केले आहे.