केंद्रीय सीईटी परीक्षेसाठी विशेष बस

By Admin | Published: May 1, 2016 01:53 AM2016-05-01T01:53:44+5:302016-05-01T01:53:44+5:30

अखिल भारतीय प्री मेडिकल व प्री डेंटल प्रवेश परीक्षा ठाणे शहरातील तीन केंद्रामध्ये रविवारी होणार आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ये-जाण्यासाठी ठाणे पालिका परिवहन सेवेने ठाणे स्टेशनपासून

Special bus for central CET exam | केंद्रीय सीईटी परीक्षेसाठी विशेष बस

केंद्रीय सीईटी परीक्षेसाठी विशेष बस

googlenewsNext

ठाणे : अखिल भारतीय प्री मेडिकल व प्री डेंटल प्रवेश परीक्षा ठाणे शहरातील तीन केंद्रामध्ये रविवारी होणार आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ये-जाण्यासाठी ठाणे पालिका परिवहन सेवेने ठाणे स्टेशनपासून खास बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात या परीक्षेचे केंद्र पोखरण रोड नंबर २ येथे लोकपुरम स्कूल,व सावरकरनगर येथील ज्ञानोदय विद्यामंदिर ज्यु. कॉलेज, तसेच कोलशेत एअरफोर्स स्टेशन येथील केंद्रीय विद्यालय अशी असणार आहेत. येथे विद्यार्थी व पालकांना ये - जा करण्यासाठी ठाणे परिवहन सेवेकडून ठाणे स्थानक ते पवारनगर, मार्ग क्र . १२, ठाणे स्थानक ते वागळे आगार, मार्ग क्र . ६ आणि ठाणे स्थानक ते कोळशेत , मार्ग क्र . ९५/९८ या मार्गावर विशेष बस सेवा उपलब्ध करु न देण्यात आली आहे. या परीक्षेची वेळ सकाळी १०.०० ते दुपारी १ या वेळेला असल्याने, विद्यार्थी परिक्षा केंद्रावर येण्या-जाण्यासाठी बस सेवेचे मार्गदर्शन करण्याकरिता ठाणे स्टेशन (सॅटीस) येथे सहाय्यक वाहतूक निरिक्षक यांची नियुक्ती केली आहे. तरी परिक्षार्थ्यांनी व पालकांनी या बससेवा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Special bus for central CET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.