पालिका रुग्णालयांत स्तनपानासाठी विशेष कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:01 AM2017-08-05T03:01:22+5:302017-08-05T03:01:24+5:30

१ ते ७ आॅगस्टदरम्यान असलेल्या ‘जागतिक स्तनपान सप्ताहा’चे निमित्त साधून, महापालिका रुग्णालयांत लवकरच स्तनपान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. शहर-उपनगरांतील पालिका रुग्णालयांत स्तनपान कक्ष सुरू करण्याचे आदेश

 Special Cell for Breastfeeding in Municipal Hospital | पालिका रुग्णालयांत स्तनपानासाठी विशेष कक्ष

पालिका रुग्णालयांत स्तनपानासाठी विशेष कक्ष

Next

स्नेहा मोरे 
मुंबई : १ ते ७ आॅगस्टदरम्यान असलेल्या ‘जागतिक स्तनपान सप्ताहा’चे निमित्त साधून, महापालिका रुग्णालयांत लवकरच स्तनपान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. शहर-उपनगरांतील पालिका रुग्णालयांत स्तनपान कक्ष सुरू करण्याचे आदेश, महापालिका प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिले आहेत. या स्तनपान सप्ताहात जनजागृतीच्या निमित्ताने, रुग्णालयांतील जागेची उपलब्धता तपासून या विषयी कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.
बाळाला स्तनपान करणे ही आई आणि बाळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी बाळांना स्तनपान देण्यात अनेक महिलांना संकोच वाटतो. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी एका वेगळ्या जागेची गरज आहे.
महापालिका, रेशनिंग आॅफिस, आरटीओ, तहसील, पोलीस
ठाणे, न्यायालय, रेल्वे स्टेशन, यांसारख्या सरकारी कार्यालयांत अनेकदा स्तनदा मातांना तान्हुल्या बाळांना घेऊन तासन्तास ताटकळत राहावे लागते. येथे या मातांना
स्तनपान करणे गैरसोयीचे होते. यावर उपाय म्हणून लवकरच मुंबई
शहर-उपनगरांतील पालिका रुग्णालयांत स्तनपान कक्ष सुरू होणार आहेत.

Web Title:  Special Cell for Breastfeeding in Municipal Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.