Join us

शीना बोरा हत्याप्रकरण, देवेन भारतींना विशेष न्यायालयाचे समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 5:57 AM

शीना बोरा हत्येप्रकरणी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची साक्ष पुढील आठवड्यात न्यायालयात नोंदविण्यात येणार आहे.

मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची साक्ष पुढील आठवड्यात न्यायालयात नोंदविण्यात येणार आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने देवेन भारती यांना साक्ष देण्यासाठी मंगळवारी समन्स बजावले.शीना बोरा हत्या प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यापूर्वी पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती हेही या प्रकरणाचा तपास करत होते. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे.सी. जगदाळे यांनी देवेन भारती यांना मंगळवारी समन्स बजावले.शीना बोरा हत्येचा तपास करणाऱ्या तपास पथकात सहभागी असलेले पोलीस निरीक्षक नितीन अलखनुरे यांची साक्ष सोमवारी न्यायालयात नोंदविण्यात आली. त्यांची उलटतपासणी पुढे ढकलण्याची बचावपक्षाची विनंती विशेष न्यायालयाने मान्य केली.शीना बोरा हत्येप्रकरणी सीबीआयने इंद्राणी मुखर्जीला मुख्य आरोपी केले आहे. आर्थिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.