व्हिस्टाडोम कोचसह विशेष डेक्कन एक्स्प्रेस शनिवारपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:06 AM2021-06-24T04:06:18+5:302021-06-24T04:06:18+5:30

पश्चिम घाटावरील नदी, खोरे, धबधबे दृश्यांचा आनंद घेणे शक्य लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेना संसर्ग नियंत्रणात येत असून ...

Special Deccan Express with Vistadom coaches starting from Saturday | व्हिस्टाडोम कोचसह विशेष डेक्कन एक्स्प्रेस शनिवारपासून सुरू

व्हिस्टाडोम कोचसह विशेष डेक्कन एक्स्प्रेस शनिवारपासून सुरू

Next

पश्चिम घाटावरील नदी, खोरे, धबधबे दृश्यांचा आनंद घेणे शक्य

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काेराेना संसर्ग नियंत्रणात येत असून आता मध्य रेल्वेने मुंबई-पुणे विशेष डेक्कन एक्स्प्रेसच्या सेवा व्हिस्टाडोम कोचसह २६ जूनपासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह धावेल. त्यामुळे प्रवाशांना पश्चिम घाटावरील नदी, खोरे, धबधबे दृश्यांचा आनंद घेता येईल.

सध्या व्हिस्टाडोम कोच मुंबई-मडगाव जनशताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे. आता मुंबई-पुणे मार्गावरील प्रवासी येथून जाताना जवळच्या माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसदरी जवळील), उल्हास नदी (जांबरूंग जवळील), उल्हास व्हॅली, खंडाळा परिसर आदींसह लोणावळा आणि दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे, धबधबे या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात. विस्टाडाेम कोचच्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाइड विंडो पॅन आणि काचेचे छप्पर (टॉप), फिरण्यायोग्य खुर्ची आणि पुशबॅक खुर्च्या इत्यादींचा समावेश आहे.

* या वेळेत धावणार

- विशेष डेक्कन एक्स्प्रेस २६ जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ७ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११.०५ वाजता पुण्याला पोहोचेल.

- डेक्कन एक्स्प्रेस विशेष २६ जूनपासून दररोज १५.१५ वाजता पुण्याहून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १९.०५ वाजता पोहोचेल. तिला दादर, ठाणे, कल्याण, नेरळ, लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजी नगर येथे थांबे असतील.

- केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

.........................................................

===Photopath===

230621\188-img-20210623-wa0006.jpg

===Caption===

विस्टाडोम

Web Title: Special Deccan Express with Vistadom coaches starting from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.