मध्य रेल्वेची प्रवाशांना विशेष दिवाळी भेट, ४० नवीन फे-या, हार्बरच्या प्रवाशांनाही लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 02:18 AM2017-09-19T02:18:55+5:302017-09-19T02:18:57+5:30

वाढती प्रवासी संख्या आणि प्रवाशांचा सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेने दिवाळीपासून लोकलच्या ४० फे-या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य मार्गासह ट्रान्स हार्बर आणि हार्बरच्या प्रवाशांनादेखील या फे-यांचा लाभ मिळणार आहे.

Special Diwali gift to the passengers of the Central Railway, 40 new fairs, Harbor also benefits the passengers | मध्य रेल्वेची प्रवाशांना विशेष दिवाळी भेट, ४० नवीन फे-या, हार्बरच्या प्रवाशांनाही लाभ

मध्य रेल्वेची प्रवाशांना विशेष दिवाळी भेट, ४० नवीन फे-या, हार्बरच्या प्रवाशांनाही लाभ

Next

महेश चेमटे 
मुंबई : वाढती प्रवासी संख्या आणि प्रवाशांचा सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेने दिवाळीपासून लोकलच्या ४० फे-या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य मार्गासह ट्रान्स हार्बर आणि हार्बरच्या प्रवाशांनादेखील या फे-यांचा लाभ मिळणार आहे.
उपनगरीय लोकल सेवेवरील ताण कमी करण्यासाठी लोकल फे-यांची संख्या वाढवण्यास रेल्वे प्रशासनाने तयारी दर्शवली आहे. त्यानुसार दिवाळीपासून मध्य मार्गावर १२ नवीन फे-यांचा समावेश करण्यात येणार आहे. या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी दादर येथून सुटतील. या लोकल फेºया दादर-कल्याण, दादर-टिटवाळा/ आसनगाव, दादर-अंबरनाथ/ बदलापूर या मार्गावर धावतील. नवीन वेळापत्रकात या फेºयांचा समावेश करण्यासाठी प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे.
>या मार्गावर नवीन फेºया
ट्रान्स हार्बर मार्गासह हार्बर मार्गावर प्रत्येकी १४ लोकल फेºयांचा समावेश असेल. ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी, ठाणे-पनवेल आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल या मार्गावर नवीन फेºयांचा समावेश आहे. मध्य रेल्वेवर १६५८ लोकल फे ºया रोज होतात. यापैकी ८३६ फेºया या मध्य मार्गावर तर हार्बर मार्गावर ५९० आणि ट्रान्स हार्बरवर २३२ फेºया होतात. उपनगरीय रेल्वेतून ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.
>एसी लोकलच्या निविदा नोव्हेंबरमध्ये
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी-३) प्रकल्पांतर्गत दाखल होणाºया लोकल या वातानुकूलित असतील. यासाठी नोव्हेंबर महिन्यात निविदा मागविण्यात येतील. त्यानंतर लोकल येणाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Special Diwali gift to the passengers of the Central Railway, 40 new fairs, Harbor also benefits the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.