मुंबई : ७१ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर गुगलने पुन्हा एकदा वैशिष्ट्यपूर्ण डूडलद्वारे सर्वांचेच मन जिंकले. या डूडलद्वारे गेल्या ७० वर्षांचा आढावा घेण्यात आला, विशेष म्हणजे या डूडलचे डिझाईन मुंबईकर असलेल्या सबीना कर्निक हिने केले होते. या डूडलमध्ये दिल्लीचे संसद भवन दशर््ाविण्यात आले, हे डिझाईन राष्ट्रध्वजाच्या रंगात दिसून आले.गुगल नेहमीच विशेष सण, दिवस यांचे डूडल तयार करत असते. अनेक जण यासाठी पुढाकार घोत. त्यातील उल्लेखनीय डूडल नेटकºयांना पाहायला मिळते. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अशाच प्रकारे तयार करण्यात आलेल्या डूडलमध्ये राष्ट्रीय पक्षी असलेला मोर, अशोकचक्र दाखविण्यात आले होते. या डूडलचे डिझाइन रंगीत कागदांद्वारे करण्यात आले होते.या डूडलची गंमत म्हणजे हे सर्व डिझाईन त्रिमिती पद्धतीत रेखाटण्यात आले होते. या डूडलच्या माध्यमातून ७० वर्षांच्या कालावधीतील महत्त्वाच्या घडामोडी दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा इतिहास नजरेसमोर येतो.यापूर्वी स्वातंत्र्यदिनी , राष्ट्रध्वजाच्या वेगवेगळ््या तºहा, दांडी सत्याग्रह, लाल किल्ला, डाक तिकीट्स अशा वेगवेगळ््या विषयांवर आधारित डूडल साकारण्यात आले होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ‘डूडल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 5:27 AM