मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून तमिळनाडू येथील वेलंकनी उत्सवासाठी विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. वेलंकनी या ठिकाणी २९ आॅगस्ट ते ८ सप्टेंबरपर्यंत वेलंकनी मातेची यात्रा आहे. या यात्रेला देशभरासह मुंबई, ठाणे, वसई, विरार, भार्इंदर येथील ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने जातात. त्यामुळे या विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे.मध्य रेल्वे मार्गांवरील गाडी क्रमांक ०१०३१ लोकमान्य टिळक टर्मिनल वरून २६ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी वेलंकनीसाठी एक्स्प्रेस सुटेल, तर गाडी क्रमांक ०१०३२ २८ वेलंकनीवरून आॅगस्ट, २०१९ रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी मुंबईकडे प्रस्थान करेल.पश्चिम रेल्वे मार्गावरून गाडी क्रमांक ०९०४१ वांद्रे टर्मिनस ते वेलंकनी विशेष एक्स्प्रेस २७ आॅगस्ट रोजी चालविण्यात येणार आहे. वांद्रेहून गाडी दुपारी २ वाजून ४५ मिनिटाला सुटणार आहे. यासह गाडी क्रमांक ०९०४२ वेलंकनी ते वांद्रे टर्मिनस विशेष गाडी २८ आॅगस्ट रोजी वेलंकनी येथून ९ वाजून ४५ वांद्रे टर्मिनससाठी प्रस्थान करेल. प्रवाशांची मेल, एक्स्प्रेस होणारी गर्दी कमी करण्यासाठी विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.>विशेष एक्स्प्रेसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा- वेलंकनी यात्रेकरू संघटनावेलंकनी यात्रेसाठी विशेष मेल, एक्स्प्रेसची सुविधा मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या विशेष मेल, एक्स्प्रेसचा लाभ प्रवाशांनी घेण्याचे आवाहन वेलंकनी यात्रेकरू संघटनेचे संघटक चार्ली रोझारिओ यांनी केले. वेलंकनी भाविक विशेष गाड्यांच्या घोषणेची वाट पाहत होते. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून २६आॅगस्ट रोजी एलटीटीवरून विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. वेलंकनी गाडीचे आरक्षण १४ जुलैपासून सुरुवात झाली आहे. प्रवासी मोठ्या उत्साहात यागाडीचे आरक्षण करत असल्याचे रोझारिओ यांनी सांगितले. वांद्रे ते वेलंकनी विशेष गाडीचे आरक्षण१६ जुलैपासून होणार आहे. याचीनोंद घेऊन प्रवाशांनी लवकरआरक्षण करण्याचे आवाहन रोझारिओ यांनी केले.
वेलंकनी उत्सवासाठी विशेष एक्स्प्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 6:14 AM