महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी पाहता पश्चिम रेल्वेच्या विशेष सोयीसुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:13 AM2022-12-06T07:13:34+5:302022-12-06T07:14:03+5:30
आपत्कालीन परिस्थितीचा सामना कारण्यासाठी रेल्वे निरीक्षकांची टीम २४/७ उपलब्ध
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायी मोठ्या संख्येने रेल्वेने येतात. या आंबेडकर अनुयायांची स्थानकात गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेने जोरदार तयारी केली आहे.
दादर स्थानकात कक्ष
प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी दादर रेल्वेस्थानकात मदत कक्ष
दादरस्थानकात चैत्यभूमी आणि राजगृह स्मारक दिशादर्शक फलक मराठी, हिंदी , इंग्रजी भाषेत आगमन , बाहेर पडण्याची ठिकाणे यासह इतर बाबींबाबत सूचनाफलक
गर्दी नियोजन
नागरिकांना ये-जा करण्यासाठी योग्य उपाययोजना आणि नकाशा तयार करण्यात आला आहे.
आरपीएफ आणि जीआरपीचे ४५० कर्मचारी तैनात
नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मेगाफोनव्दारे घोषणा
आपत्कालीन परिस्थितीचा सामना कारण्यासाठी रेल्वे निरीक्षकांची टीम २४/७ उपलब्ध ।
प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलावर सूचना
तिकीट सुविधा
दादर आणि जवळील स्थानकांत अतिरिक्त तिकीट काउंटर
एटीव्हीएमवर अतिरिक्त फॅसिलिटेटर अतिरिक्त तिकीट काउंटर कर्मचारी, तिकीट तपासनीस
मोटरमन आणि रेल्वे व्यवस्थापकांना सूचना
मोटरमन आणि रेल्वे व्यवस्थापकांना दादर स्थानकात अनुयायी चढ-उतर करताना सतर्क राहण्याची सूचना
पाण्याची सोय
पिण्याचे पाणी, चमकणारे सूचनाफलक, खाण्याची व्यवस्था
केटरिंग युनिटला सकाळी लवकर खोलण्याचे आणि रात्री शेवटच्या गाडीपर्यंत चालू ठेवण्याच्या सूचना
दादर स्थानकात अतिरिक्त शौचालय व्यवस्था
वैद्यकीय मदत कक्ष
दादर स्थानकात २४ तास आपत्कालीन किटसह डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध, पोर्टेबल मेडिकल किटसह वांद्रेत रुग्णवाहिका ७ डिसेंबरपर्यंत उपलब्ध, स्टेशन मास्तरजवळ वैद्यकीय टीमची माहिती उपलब्ध.